मुक्तपीठ टीम
सांगलीतील गावकऱ्यांनी एक वेगळेच धाडस केले आहे. साटपेवाडी या गावातील गावकऱ्यांनी कृष्णा नदीशेजारी पात्राबाहेर आलेल्या मगरीला पकडले. तिला इजा न होण्याची काळजी घेतली. त्यासाठी खांद्यावर मगर उचलून तिला वनविभागाच्या ताब्यात दिले. ही मगर सुमारे १२ फूट होती.
मगरीचा कुणी बळी जावू नये तसेच मगरीला माणसांकडून काही इजा होईल असे वाईट घडू नये म्हणून गावकऱ्यांनी हे पाऊल उचलले. कृष्णा नदीतून ही मगर बाहेर आली होती. अशा परिस्थितीत तिला कोणतीही इजा किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, म्हणून गावकऱ्यांनी मगरीला खांद्यावर घेऊन तिला वनविभागाच्या ताब्यात दिले.
सांगलीतील कृष्णा नदीकाठी मगरींचा वावर हल्ली सारखा असतो. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास नदीकाठावर सातपेवाडी गावात ही मगर दिसली.
मगरीला ताब्यात घेण्यासाठी गावातील तरूणांना जवळपास दोन तास लागले. त्यानंतर तरुणांनी मगरीला उचलून थेट वनविभागाकडे दिली. वनविभागाने मगरीला सुरक्षित अशा नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
कृष्णा नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना जिथे मगर जास्त दिसत त्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
पाहा व्हिडीओ: