Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रोजगार क्षमता असलेल्या ‘वस्त्रोद्योगा’ला बळ देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक

- उपमुख्यमंत्री अजित पवार

March 17, 2021
in सरकारी बातम्या
0
textile industry ajit pawar

मुक्तपीठ टीम

 

वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणाऱ्या उद्योगांपैकी असून हजारो कुटुबांचा चरितार्थ चालविण्याची क्षमता या उद्योगात आहे. वस्त्रोद्योगाची ही क्षमता लक्षात घेऊन या क्षेत्राचे प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविण्यात येतील. 27 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या यंत्रमागांना वीजवापरावर 75 पैसे प्रतियुनिट अतिरिक्त अनुदान देणे, रेशीम संचालनालयातील रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता देण्यासह, वस्त्रोद्योगासाठी सौरऊर्जेच्या वापराची शक्यता तपासणे आदीबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 

            राज्यातील वस्त्रोद्योगाच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार धैर्यशील माने (व्हीसीद्वारे), आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, अनिल बाबर, संजय शिंदे, आसिफ शेख रशीद  आदींसह सहकारी वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रातील मान्यवर तसेच वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

 

            वस्त्रोद्योगाला बळ देण्यासाठी 27 एचपीपेक्षा अधिक क्षमतेच्या यंत्रमागधारकांना प्रतियुनिट 75 पैसे अतिरिक्त अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. रेशीम उद्योगासाठी महत्वाच्या असलेल्या रेशीम संचालनालयातील कामाची व्याप्ती व रिक्तपदांचा विचार करुन खास बाब म्हणून कंत्राटी पध्दतीने भरण्याला परवानगी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. वस्त्रोद्योगाशी संबंधित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योग व्यवसायावर असलेले संकट थांबविण्यासाठी सूत दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

फोटोओळ – राज्यातील वस्त्रोद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार धैर्यशील माने (व्हीसीद्वारे), आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, अनिल बाबर, संजय शिंदे, आसिफ शेख रशीद  आदींसह सहकारी वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रातील मान्यवर तसेच वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.


Tags: textile industryउपमुख्यमंत्री अजित पवारपाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडेमंत्री बाळासाहेब पाटीलवस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरसहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम
Previous Post

वाझेंच्या वापरातील मर्सिडिझ आता कुणाची? गाडी सोबतच्या राजकारण्यांच्या छायाचित्राने वाढते गूढ

Next Post

किम जोंगच्या बहिणीने अमेरिकच्या अध्यक्षांना का धमकावले?

Next Post
Kim Jong Un

किम जोंगच्या बहिणीने अमेरिकच्या अध्यक्षांना का धमकावले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!