Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काश्मिरात का वाढले हिंदूंवरील दहशतवादी हल्ले? समजून घ्या कारणं…

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
काश्मीर

मुक्तपीठ टीम

केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. भारतीय संविधानातील ३७० कलम रद्द करून काश्मीरचे विभाजन केल्यानंतर उरलेल्या जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. दहशतवादाचं कंबरडं मोडणारं हे पाऊल असल्याचा दावा केला गेला. त्यामुळे आता अचानक गैरमुस्लिम असणाऱ्या हिंदू-शिख अल्पसंख्याक समाजावरील वाढलेल्या हल्ल्यांची नेमकी काय कारण हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

 

काश्मीरमध्ये नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारी

  • अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये गैरमुस्लिमांवर म्हणजेच हिंदू-शिखांवर हल्ले वाढले आहेत.
  • या समाजातील लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली जात आहे.
  • हे हत्याकांड आताच का सुरु झाले त्यासाठी केंद्र शासित प्रदेशातील प्रशासनाच्या नव्या मोहिमेकडे बोट दाखवले जात आहे.
  • काश्मिरी पंडितांच्या ९०च्या दशकातील विस्थापनांनंतर त्यांची मालमत्ता परत मिळवण्यासाठी जम्मू -काश्मीर प्रशासनाने मोहीम सुरु केली आहे.
  • ७ सप्टेंबर रोजी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी काश्मिरी पंडितांसाठी त्यांची जमीन आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी वेब पोर्टल सुरू केले.
  • विविध जिल्ह्यांच्या उपायुक्तांकडून जमीन बळकावण्याच्या आणि अतिक्रमणाच्या ५ हजार ६०० तक्रारी आल्या आहेत.
  • काश्मिरी पंडित आणि इतरांनी दाखल केलेल्या अशा २ हजार २०० तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
  • त्यामुळे हजारोंना न्याय मिळत असतानाच हजारो अतिक्रमणकर्त्यांच्या ताब्यातील मालमत्ता निघून जात आहे.

 

अब्दुल्ला सरकारनेही केला होता कायदा

  • काश्मीरातून परागंदा झालेल्यांच्या मालमत्ता विक्रीवर बंदी घालणारा कायदा आहे.
  • तत्कालीन फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स सरकारने १९९७ मध्ये ओव्हरसीज इमोव्हेबल प्रॉपर्टी नावाचा कायदा केला.
  • नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला दहशतवादी संघटनांनी केलेल्या हत्यांमुळे जम्मू-काश्मीरमधून पळून जाण्यास भाग पाडलेल्या लोकांच्या मालमत्तेच्या विक्रीवर कायद्याने बंदी घातली होती.
  • परंतु या कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधीच झाली नाही.

 

सरकारी मोहिमेचा सूड घेण्याचा दावा

  • पाकिस्तान पुरस्कृत लष्कर-ए-तैयबाशी संबंधित टीआरएफने अलिकडेच काश्मिरी पंडित आणि शिखांवर केलेले हल्ले प्रशासनाच्या “चुका दुरुस्त” करण्याच्या मोहिमेचा सूड घेण्याचा दावा केला आहे.
  • गेल्या वर्षी अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्जदारांना लक्ष्य करून टीआरएफने आपल्या दहशतवादी घातपाताची सुरुवात केली.
  • या दहशतवादी संघटनेने एक प्रमुख काश्मिरी पंडित व्यावसायिक, एका काश्मिरी शीख शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे पंडित सहाय्यक आणि श्रीनगरमधील एका स्थलांतरित खाद्य विक्रेता या सर्वांची एका आठवड्यात गोळ्या घालून हत्या केली.

Previous Post

फोन टॅपिंग प्रकरणी सुबोध जयस्वालांना समन्स! रश्मी शुक्लांवरील आरोपांप्रकरणी चौकशी!!

Next Post

जागतिक मानसिक आरोग्य दिवस : कसं राहायचं मानसिकदृष्ट्या फिट!

Next Post
mental health

जागतिक मानसिक आरोग्य दिवस : कसं राहायचं मानसिकदृष्ट्या फिट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!