मुक्तपीठ टीम
केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. भारतीय संविधानातील ३७० कलम रद्द करून काश्मीरचे विभाजन केल्यानंतर उरलेल्या जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. दहशतवादाचं कंबरडं मोडणारं हे पाऊल असल्याचा दावा केला गेला. त्यामुळे आता अचानक गैरमुस्लिम असणाऱ्या हिंदू-शिख अल्पसंख्याक समाजावरील वाढलेल्या हल्ल्यांची नेमकी काय कारण हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
काश्मीरमध्ये नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारी
- अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये गैरमुस्लिमांवर म्हणजेच हिंदू-शिखांवर हल्ले वाढले आहेत.
- या समाजातील लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली जात आहे.
- हे हत्याकांड आताच का सुरु झाले त्यासाठी केंद्र शासित प्रदेशातील प्रशासनाच्या नव्या मोहिमेकडे बोट दाखवले जात आहे.
- काश्मिरी पंडितांच्या ९०च्या दशकातील विस्थापनांनंतर त्यांची मालमत्ता परत मिळवण्यासाठी जम्मू -काश्मीर प्रशासनाने मोहीम सुरु केली आहे.
- ७ सप्टेंबर रोजी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी काश्मिरी पंडितांसाठी त्यांची जमीन आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी वेब पोर्टल सुरू केले.
- विविध जिल्ह्यांच्या उपायुक्तांकडून जमीन बळकावण्याच्या आणि अतिक्रमणाच्या ५ हजार ६०० तक्रारी आल्या आहेत.
- काश्मिरी पंडित आणि इतरांनी दाखल केलेल्या अशा २ हजार २०० तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
- त्यामुळे हजारोंना न्याय मिळत असतानाच हजारो अतिक्रमणकर्त्यांच्या ताब्यातील मालमत्ता निघून जात आहे.
अब्दुल्ला सरकारनेही केला होता कायदा
- काश्मीरातून परागंदा झालेल्यांच्या मालमत्ता विक्रीवर बंदी घालणारा कायदा आहे.
- तत्कालीन फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स सरकारने १९९७ मध्ये ओव्हरसीज इमोव्हेबल प्रॉपर्टी नावाचा कायदा केला.
- नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला दहशतवादी संघटनांनी केलेल्या हत्यांमुळे जम्मू-काश्मीरमधून पळून जाण्यास भाग पाडलेल्या लोकांच्या मालमत्तेच्या विक्रीवर कायद्याने बंदी घातली होती.
- परंतु या कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधीच झाली नाही.
सरकारी मोहिमेचा सूड घेण्याचा दावा
- पाकिस्तान पुरस्कृत लष्कर-ए-तैयबाशी संबंधित टीआरएफने अलिकडेच काश्मिरी पंडित आणि शिखांवर केलेले हल्ले प्रशासनाच्या “चुका दुरुस्त” करण्याच्या मोहिमेचा सूड घेण्याचा दावा केला आहे.
- गेल्या वर्षी अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्जदारांना लक्ष्य करून टीआरएफने आपल्या दहशतवादी घातपाताची सुरुवात केली.
- या दहशतवादी संघटनेने एक प्रमुख काश्मिरी पंडित व्यावसायिक, एका काश्मिरी शीख शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे पंडित सहाय्यक आणि श्रीनगरमधील एका स्थलांतरित खाद्य विक्रेता या सर्वांची एका आठवड्यात गोळ्या घालून हत्या केली.