Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत दहा दिवसात दहापटीपेक्षा जास्त वाढले रोजचे रुग्ण! आयुक्तांनी वर्तवलेली लॉकडाऊन भीती समजून घ्या…

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona testing

अपेक्षा सकपाळ

मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जर मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या पुढे पोहोचला तर शहरात लॉकडाऊन करावाचं लागेल असे मोठं वक्तव्य केलं आहे. तो त्यांचा मुंबईकरांना खडबडून जागं करणारा अलर्ट कॉल आहे. त्याचं कारणही तसंच आहे. गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे ७९२८ रुग्ण आढळले आहेत तर ही संख्या २५ डिसेंबर रोजी ७३१ इतकी होती. म्हणजे दहा दिवसात दहापटीपेक्षाही जास्त रोजचे नवे रुग्ण सापडत आहेत.

 

रुग्ण दुपटीचा कालावधी हा अकरा टक्क्यांनी वाढला असून ही संख्या अशीच झपाट्याने वाढत गेली तर येत्या काही दिवसात मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकण्याची भीती आहे. त्यातच खबरादारीचा उपाय म्हणून मुंबई मनपाने कोरोना चाचण्यांची संख्या ५० हजारांवर नेल्याने जर मुंबईकरांनी काळजी घेतली नाही तर तो दिवस खूपच लवकर येण्याची भीती आहे.

येत्या दहा दिवसात मुंबईत लॉकडाऊनची शक्यता

  • सध्या देशासह राज्यातील कोरोनाचा आकडा वाढताना दिसत आहे.
  • देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे.
  • जर मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या पार पोहोचला तर शहरात लॉकडाऊन सारखी कठोर पावलं उचलावी लागतील, असं मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.
  • असं असताना मुंबईत ज्यावेगाने कोरोना रुग्ण सापडत आहेत , त्यावरून येत्या दहा दिवसात हा आकडा २० हजाराच्या पार जाण्याची वर्तवली जात आहे.
  • अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेतली पाहिजे.

 

१० दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या

  • २५ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ७३१
  • २६ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ८९६
  • २७ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ७८८
  • २८ डिसेंबर २१ – मुंबई मनपा १३३३
  • २९ डिसेंबर २०२१- मुंबई मनपा २४४५
  • ३० डिसेंबर २०२१- मुंबई मनपा ३५५५
  • ३१ डिसेंबर २०२१- मुंबई मनपा ५४२८
  • १ जानेवारी २०२२ – मुंबई मनपा ६१८०
  • २ जानेवारी २०२२ – मुंबई मनपा ७७९२
  • ३ जानेवारी २०२२- मुंबई मनपा ७९२८

मुंबईतील ८० टक्के रूग्ण ओमायक्रॉनबाधित

  • सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल ८० टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिल्याची माहिती डॉ. चहल यांनी दिली आहे.
  • असं असलं तरी सध्या तरी ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
  • मुंबई मनपाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कॉरंटाईन तसंच होम कॉरंटाईन करण्यासाठी विषेश प्रोग्राम राबवल्याची माहितीही डॉ. चहल यांनी दिली.

Tags: BMCcoronaIqbal Singh Chahallockdownmumbaiइकबाल सिंह चहलमुंबईमुंबई मनपामुंबईत लॉकडाऊनलॉकडाऊन
Previous Post

मुंबईत प्रशासन कठोर भूमिकेत, इमारत सील करण्यासाठी बदलले निकष

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आणि वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Next Post
dhananjay munde

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आणि वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!