अपेक्षा सकपाळ
मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जर मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या पुढे पोहोचला तर शहरात लॉकडाऊन करावाचं लागेल असे मोठं वक्तव्य केलं आहे. तो त्यांचा मुंबईकरांना खडबडून जागं करणारा अलर्ट कॉल आहे. त्याचं कारणही तसंच आहे. गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे ७९२८ रुग्ण आढळले आहेत तर ही संख्या २५ डिसेंबर रोजी ७३१ इतकी होती. म्हणजे दहा दिवसात दहापटीपेक्षाही जास्त रोजचे नवे रुग्ण सापडत आहेत.
रुग्ण दुपटीचा कालावधी हा अकरा टक्क्यांनी वाढला असून ही संख्या अशीच झपाट्याने वाढत गेली तर येत्या काही दिवसात मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकण्याची भीती आहे. त्यातच खबरादारीचा उपाय म्हणून मुंबई मनपाने कोरोना चाचण्यांची संख्या ५० हजारांवर नेल्याने जर मुंबईकरांनी काळजी घेतली नाही तर तो दिवस खूपच लवकर येण्याची भीती आहे.
येत्या दहा दिवसात मुंबईत लॉकडाऊनची शक्यता
- सध्या देशासह राज्यातील कोरोनाचा आकडा वाढताना दिसत आहे.
- देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे.
- जर मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या पार पोहोचला तर शहरात लॉकडाऊन सारखी कठोर पावलं उचलावी लागतील, असं मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.
- असं असताना मुंबईत ज्यावेगाने कोरोना रुग्ण सापडत आहेत , त्यावरून येत्या दहा दिवसात हा आकडा २० हजाराच्या पार जाण्याची वर्तवली जात आहे.
- अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेतली पाहिजे.
१० दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या
- २५ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ७३१
- २६ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ८९६
- २७ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ७८८
- २८ डिसेंबर २१ – मुंबई मनपा १३३३
- २९ डिसेंबर २०२१- मुंबई मनपा २४४५
- ३० डिसेंबर २०२१- मुंबई मनपा ३५५५
- ३१ डिसेंबर २०२१- मुंबई मनपा ५४२८
- १ जानेवारी २०२२ – मुंबई मनपा ६१८०
- २ जानेवारी २०२२ – मुंबई मनपा ७७९२
- ३ जानेवारी २०२२- मुंबई मनपा ७९२८
मुंबईतील ८० टक्के रूग्ण ओमायक्रॉनबाधित
- सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल ८० टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिल्याची माहिती डॉ. चहल यांनी दिली आहे.
- असं असलं तरी सध्या तरी ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
- मुंबई मनपाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कॉरंटाईन तसंच होम कॉरंटाईन करण्यासाठी विषेश प्रोग्राम राबवल्याची माहितीही डॉ. चहल यांनी दिली.