मुक्तपीठ टीम
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी पाटणा येथे पोहोचलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ‘भाजप मुक्त भारत’चा नारा लगावला. येथे ते म्हणाले की, “नितीशजींसोबत चर्चा झाली आणि एक गोष्ट मान्य झाली की, भाजप सरकारला देशातून कोणत्याही प्रकारे हाकललेच पाहिजे. नरेंद्र मोदीजी ८ वर्षे पंतप्रधान राहिले आहेत, मात्र प्रत्येक क्षेत्रात देश उद्ध्वस्त होत असल्याने देशातील सर्व जनता अस्वस्थ आहे.” यावेळी पत्रकारांनी छेडले असता त्यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितिश कुमारांचे नाव तर घेतले नाही पण अजेंडा मात्र मांडला.
भाजपमुक्त भारतातासाठी केसीआर सक्रिय!
तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी भाजपामुक्त बारत करण्याच्या प्रयत्न सुरु केले आहेत.
त्या प्रयत्नांचाच एक एक भाग म्हणून भेट घेतली आणि देशातील सध्याच्या समस्यांसाठी केंद्र सरकारला दोष देत “भाजप-मुक्त भारत”चे आवाहन केले. पाटणा येथील पत्रकार परिषदेत हे आवाहन करणाऱ्या केसीआर यांनी संयुक्त विरोधी पक्षाचे नेतृत्व कोण करणार आणि त्यात काँग्रेसचा समावेश होणार का, हे प्रश्न मात्र, टाळला.
पाटणा येथील पत्रकार परिषदेत केसीआर यांनी केलेले वक्तव्य!
- पत्रकार परिषदेत केसीआर यांनी नितीश कुमार यांना ‘मोठा भाऊ’ असे संबोधले.
- पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि त्यात काँग्रेसची भूमिका या प्रश्नावर भाजपविरोधात आवाज उठवणारे के. चंद्रशेखर राव म्हणाले, वेळ आल्यावर या गोष्टी ठरवल्या जातील. आम्हाला घाई नाही.
- केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे व्यापारी देशातून आपला पैसा काढून घेत आहेत, असा आरोप के. चंद्रशेखर राव यांनी केला.
- कोणत्याही विरोधी पक्षाशी सल्लामसलत न करता सशस्त्र दलात भरतीची “अग्निपथ” योजना आणल्याबद्दल त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
- बिहारच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जाऊ शकते का, असे विचारले असता केसीआर म्हणाले, “आम्ही या गोष्टी नंतर ठरवू. नितीश कुमार हे देशातील सर्वात ज्येष्ठ आणि सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत.”