Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या माध्यम प्रमुखपदी रघुनाथ पांडे यांची नियुक्ती

September 1, 2022
in घडलं-बिघडलं
0
Appointment of Raghunath Pandey as media chief of BJP state president

मुक्तपीठ टीम

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे माध्यम प्रमुख म्हणून ज्येष्ठ पत्रकार व संपादक रघुनाथ पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती करत असल्याचे पत्र रघुनाथ पांडे यांना दिले आहे. रघुनाथ पांडे यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकांमध्ये पत्रकारिता केली तसेच संपादक म्हणून कामाचा ठसा उमटविला आहे. राजकीय, साहित्य, चित्रपट व विकासात्मक वार्तांकन हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.

रघुनाथ पांडे यांना ३० वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून  त्यांनी अमरावती , नागपूर , औरंगाबाद ,मुंबई, नवी दिल्ली येथे त्यांनी पत्रकारिता केली असून प्रिंट, टीव्ही आणि वेब या जनसंवाद माध्यमांच्या क्षेत्रात त्यांनी काम केले. दैनिक हिंदुस्थान , तरुण भारत , महाराष्ट्र टाइम्स, सकाळ या दैनिकात त्यांनी  बातमीदारी केली तर दैनिक ‘सामना’च्या विदर्भ आवृत्तीचे ते प्रमुख होते. त्यांनी मुंबई येथे लोकमतच्या सेंट्रल डेस्क या संपादकीय व्यवस्थेत राज्य पातळीवर अनेक वर्षे काम केले. तसेच नवी दिल्ली येथे ‘लोकमत’चे  विशेष राजकीय प्रतिनिधी म्हणून संसदिय कामकाजाचे वार्तांकनही  केले. ‘दिल्ली दरबार’,‘वेध’ व शून्य प्रहर हे त्यांचे राजकीय स्तंभ नियमित प्रसिद्ध झाले आहेत. नागपूर येथे दैनिक पुण्यनगरीच्या विदर्भ आवृत्तीचे व नवभारत समूहाच्या नवराष्ट्र या दैनिकाचे संपादकपद त्यांनी भूषविले. राजकीय, साहित्य,चित्रपट या वार्तांकनासाठी त्यांनी परदेश प्रवास केले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाचा राज्य विकासवार्ता पुरस्कार त्यांना १९९० मध्ये मिळाला. त्यासोबतच राज्य सरकारचा लोकनायक बापुजी अणे पत्रकारिता पुरस्कार, महात्मा गांधी पत्रकारिता पुरस्कार, लोकमत समूहाचा पत्रपंडित पां. वा. गाडगीळ आर्थिक व विकासात्मक लेखन पुरस्कारासह सामाजिक व स्वयंसेवी संघटनांचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या विद्यापीठीय समितीत त्यांनी अनेक वर्षे योगदान दिले आहे.


Tags: BJPMaharashtraMedia ChiefRaghunath Pandeyमहाराष्ट्ररघुनाथ पांडे
Previous Post

तेलंगणाचे मुख्यमंत्री बिहारमध्ये! केसीआर यांची भाजपमुक्त भारतची घोषणा!

Next Post

राज्यात ७८१ नवे रुग्ण, १५२३ बरे! मुंबई २७२, नाशिक ७, नागपूर ६ नवे रुग्ण !!

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात ७८१ नवे रुग्ण, १५२३ बरे! मुंबई २७२, नाशिक ७, नागपूर ६ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!