मुक्तपीठ टीम
भारताच्या तेजस लढाऊ विमानामध्ये वापरल्या जाणार्या ऑन-बोर्ड ऑक्सिजन तंत्रज्ञानाचा उपयोग आता ऑक्सिजन सिलिंडर्सची तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी करणं शक्य आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. ती कमतरता दूर करण्याचा उपाय म्हणून डीआरडीओने एसपीओ २ पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली विकसित केली आहे. ज्याचा उपयोग अत्यधिक उंचीच्या ठिकाणी पोस्ट केलेले सैनिक तसेच कोरोना रुग्ण करू शकतात. सध्याच्या कोरोना परिस्थितीत ही स्वयंचलित यंत्रणा वरदान ठरू शकते, असा दावा संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
डीआरडीओच्या डिफेन्स बायो-इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रो मेडिकल प्रयोगशाळेने विकसित केलेली ही प्रणाली एसपीओ २ पातळीवर आधारित पूरक ऑक्सिजन पुरवते. त्यामुळे हायपोक्सिया या प्राणघातक समस्येला प्रतिबंध होतो. हायपोक्सिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण शरीराच्या संपूर्ण उर्जा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अपुरी असते. कोरोना रूग्णात विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणारी ही परिस्थिती भयावह होते. सध्याच्या संकटाच्या जीवघेण्या स्वरुपातील हा एक प्रमुख घटक आहे.
डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. रेड्डी पुढे म्हणाले की, “अत्यंत उच्च-उंच भागात तैनात असलेल्या सैनिकांसाठी विकसित केलेली एसपीओ २ आधारित पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली कोरोना रूग्णांनाही उपयोगी ठरते.”
पाहा व्हिडीओ: