Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षक सक्षमीकरणासाठी टीचर टॉक अॅप, चर्चा करा-मते मांडा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
TCHRTALK

मुक्तपीठ टीम

सहकारी शिक्षकांशी संपर्क साधण्यासाठी, मतांची देवाणघेवाण करण्यासाठी, समस्या निवारणासाठी तसेच टिकाटिप्पणी शेअर करण्यासाठीचे व्यासपीठ अर्थात टीचर्स टॉक हे एक विशेष अॅप्लीकेशन आहे. हे अॅप शिक्षकांच्या कार्यक्षेत्राची संधी तर वाढवेलच त्यासोबत शिक्षक समुदायाच्या उन्नतीसाठीही काम करणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षण समुदायाच्या सक्षमीकरणासाठी एस आर दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक रामचंद्र दळवी यांनी या टीचर टॉक अॅपचे नुकतेच लोकार्पण केले. सदर अॅप टीच ओ टीच सोशल संस्थेने विकसित केले आहे.

 

डिजिटलायझेशनच्या वेगवान युगात सुसंगत शिक्षकांचा व्यावसायिक विकास व्हावा यादृष्टीने सदर अॅपची निर्मिती केली आहे. यामुळे शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होईल आणि शिक्षकांचा सन्मानही वाढले. सदर अॅपमुळे शिक्षक, सल्लागार समिती, शिक्षण विभाग आणि शाळा यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची दरी नाहीशी होण्यास नक्कीच मदत होईल. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट (#TransformingTheEducation#) करणे हे या ऍपचे उद्दीष्ट्य आहे.

 

नोंदणीकृत शिक्षक या नव्या अॅपद्वारे, सर्वेक्षण (ओपिनिएन पोल) करू शकतात, स्थानिक प्रश्न सोडवू शकतात, तक्रारी नोंदवू शकतात, स्थानिक घटनांबद्दल स्वत:ला अदययावतही करू शकतात. याशिवाय सवलतीच्या दरात घरगुती अन्य वस्तू खरेदी करू शकतात. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून तेथून डाऊनलोड करणे शक्य आहे.

 

“शिक्षकांच्या गरजा आम्ही जाणतो. एस आर दळवी (आय) फाऊंडेशन शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीच स्थापन करण्यात आले आहे. या फाऊंडेशनद्वारे शिक्षकांच्या व्यावसायिक समस्या निश्चितच सोडविल्या जातील. शिक्षकांच्या मूलभूत तत्वांचा मजबूत पाया तयार करण्यासाठी या अॅपची मदत होईल. जगावर अधिराज्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनाही या अॅपमुळे मदत होईल पण त्यासोबतच अडचणीही दूर केल्या जातील . राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची भूमिका शिक्षकांनी बजावली आहे आणि सदय शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी #TransformingTheEducation#” शिक्षकांना आम्ही नक्की मदत करू असे एस आर दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक रामचंद्र दळवी म्हणाले. ”

 

“विद्यार्थी तसेच शिक्षकांची प्रगती आणि समाधान हे आमच्या अस्तित्वाचे मूळ आहे. आम्हाला शिक्षकांशी सखोल आणि सकारात्मक संबंध स्थापित करायचा आहेच पण तो आत्मविश्वासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण हवा ” असे दळवी पुढे म्हणाले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: #TransformingTheEducation#एस आर दळवी (आय) फाऊंडेशनटीचर्स टॉक
Previous Post

ड्रोनद्वारे औषधे वितरणाची शेवटच्या टप्प्यातील चाचणी यशस्वी!

Next Post

भारतीय खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ!

Next Post
Food

भारतीय खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!