Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षकाला शिक्षाच व्हावी! मासिक पाळी असल्यानं विद्यार्थीनीला वृक्षारोपणापासून रोखलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Teacher Stop Student From Planting Trees Due To Menstruation In Nashik

मुक्तपीठ टीम

जगात आज महिलांचं स्थान हे पुरुषांच्या बरोबरीचं आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला या सर्वोच्च पदी आहेत. मुलगी शिकली,प्रगती झाली असा सुविचार शाळेवरच्या फळ्यावर तर भरपूर वेळा लिहिला जातो. मात्र पुरोगामी आणि बुरसटलेल्या विचारांच्या लोकांमुळे अंधश्रद्धांचं महत्व वाढतं. नाशिक येथील आश्रम शाळेत एका मुलीला मासिक पाळी आल्याने तिला वृक्षारोपण करण्यापासून रोखण्यात आले. झाड लावले तर ते जळून जाईल, असे म्हणत शिक्षकांनीच विद्यार्थिनीला वृक्षारोपण करू दिले नाही. संबंधित विद्यार्थिनीने नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्तांची भेट संपूर्ण घेटनेची माहिती दिली. या मुलीच्या तक्रारीची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली असून, संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

  • देवगाव येथील शासकीय आश्रमशाळेने गेल्या आठवड्यात वृक्षारोपण अभियान राबवले.
  • त्यावेळी शाळेच्या एका शिक्षकाने, ‘ज्या विद्यार्थिनीला मासिक पाळी असेल, त्यांनी वृक्षारोपण करू नका. त्यांनी लावलेले झाड जगणार नाही, असे सांगितले.
  • विशेष म्हणजे आपले हे अजब तत्त्वज्ञान त्यांनी १२ वी विज्ञानशाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीस ऐकवले आणि तिला झाडाचे रोप लावण्यास मनाई केली.
  • याबाबत या विद्यार्थिनीने रविवारी श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान मधे यांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार कथन केला.
  • मधे यांनी तातडीने आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांना दूरध्वनीवरून घडलेला प्रकार सांगितला.
  • मात्र, त्यानंतरही शासन यंत्रणा हालली नाही.
  • अखेर मंगळवारी संबंधित मुलीने मंगळवारी थेट अप्पर आयुक्त यांची भेट घेत घडलेला प्रकार कथन केला.

पीडित विद्यार्थिनीची संबंधित शिक्षकांवर कडक कारवाईची मागणी…

  • मासिक पाळी सुरू असेल, त्या विद्यार्थिनीने झाड लावू नये. नाही तर हे झाड जळून जाईल’… असे शिक्षकाने सांगितले.
  • यानंतर मी शिक्षकांना थेट जाब विचारला.
  • परंतु, शिक्षकांनी मलाच दटावले आणि बाहेर काढून दिले.
  • त्यामुळे या प्रकाराबाबत थेट आदिवासी आयुक्तांकडेच तक्रार केली आहे.
  • सदरचा प्रकार अयोग्य असून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी.

हा प्रकार निंदनीय, भगवान मधे

  • मुलींना साक्षर करीत आदिवासी समाजाची उन्नती साधण्यासाठी आश्रमशाळांची आखणी करण्यात आली आहे.
  • मात्र, त्याच शाळांमधून अद्यापही मध्ययुगीन बुरसटलेल्या विचारांचे पाठ दिले जात आहेत.
  • हा प्रकार निंदनीय आहे, असे मधे यांनी सांगितले.

Tags: Bhagwan MadhenashikPlanting Treesनाशिकभगवान मधेमासिक पाळीवृक्षारोपण
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE उद्धव ठाकरे शिंदेगटाला अचानक नावडते का झाले? ऐका जयंत पाटील यांना काय वाटतं…

Next Post

ट्विटरची व्यथा: “सरकार अकाऊंट ब्लॉक करत राहिलं, तर आमचा धंदाच बंद होईल!”

Next Post
twitter (3)

ट्विटरची व्यथा: "सरकार अकाऊंट ब्लॉक करत राहिलं, तर आमचा धंदाच बंद होईल!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!