मुक्तपीठ टीम
भारतात होणारी करचोरी रोखण्यासाठी वित्त मंत्रालयाने आता कंबर कसली आहे. वित्त मंत्रालय याचा विचार करत आहे आणि त्यावर नवीन योजना आणणार आहे. यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना करचोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी सूचित केले की, सध्याच्या तंत्रज्ञान कंपन्यांनाही अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सोपवले जाऊ शकते.
महसूल अधिकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार
- करचोरी रोखण्यासाठी रेव्हेन्यू ऑफिसर्स म्हणजेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
- निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटाचे चांगले विश्लेषण महसूल चोरी शोधण्यात अधिकाऱ्यांना मदत करू शकते.
- चोरटे चुकीच्या परताव्यावर दावा करून किंवा सरकारी तिजोरीचे नुकसान करण्यासाठी खोट्या कंपन्या तयार करत आहेत आणि अधिकाऱ्यांना विशेषत: वरिष्ठ अधिकार्यांना प्रशिक्षण देऊन यात मदत होऊ शकते.
निर्मला सीतारामन यांनी खारघर नोड येथे एका कार्यक्रमात महसूल विभागाच्या अधिकार्यांना संबोधित करताना सांगितले की, लवकरच आम्ही देशातील विविध भागांतील अधिकार्यांना प्रशिक्षण देणार आहोत. यामुळे प्रत्येकाला तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सोयीस्कर वाटेल आणि कर चोरी टाळता येईल.