मुक्तपीठ टीम
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाने अतिरौद्र रुप धारण केले आहे. चक्रीवादळ वेगवान असून ते गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ठिकाणी याचा यासह काही ठिकाणी जाणवला आहे. अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यांसह घरांची आणि झाडांची पडझड पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. रविवारी रात्रीपासून मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा यासह इतर ठिकाणी पाऊस पडत आहे. तर पुढील काही तासांत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील परिस्थिती
- तौत्के चक्रीवादळ हे सध्या मुंबईपासून सुमारे १५० किमी अंतरावर आहे.
- मुंबईला हे वादळ थेट धडकणार नसलं तरीही त्याचे थेट परिणाम मात्र शहरात दिसून येण्यास सुरुवात झाली आहे.
- मुंबईत मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचे वारे आणि मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसालाही सुरुवात झाली आहे.
- मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे.
- मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे.
- पुढील चार – पाच तास मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहणार.
- याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- मुंबईत आतापर्यंत ३४ ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.
- यात मुंबई शहर ११, पश्चिम उपनगर १७, पूर्व उपनगरात ६ ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.
ठाणे, नवी मुंबईत वीज खंडित
- तौत्के चक्रीवादळाचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे.
- रविवार रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे.
- ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे.
- अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.
- त्यामुळे ठाणे, नवी मुंबईसह इतर ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे.
रत्नागिरी, सिंधदुर्गात वादळाचा फटका
- रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
- रत्नागिरीतील १०४ गावांमधील ८०० ते १ हजार घरांची पडझड झाली आहे.
- रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील बहुतांश गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे.
- रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत ६ हजार ५४० नागरिकांनी सुरक्षित जागी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
- रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी करण्यात आले आहे.
पुणे, कोल्हापूरात सोसाट्याच्या वाऱ्याह पाऊस
- पुणे, कोल्हापूर, अमरावती, वाशिम या जिल्ह्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.
- पुण्यात वादळी वारा आणि पावसामुळं झाडं कोसळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
- तर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात एकीकडे जोरदार वारा आणि दुसरीकडे थंडीमुळे थंडीने हा परिसर गारठून गेला.
लसीकरण केंद्र बंद
- तौक्ते चक्रीवादळाच्या पाश्वभूमीवर मुंबई, पालघरमधील कोरोना लसीकरण केंद्रं बंद ठेवण्यात आले आहेत.
- पुढील दोन दिवस ही लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.
- मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलरसह, आयसीयूची सुविधा करण्यात आली आहे.