मुक्तपीठ टीम
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना सध्या कोरोनासोबतच ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचा सामना करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रात पोहचलेले या चक्रीवादळाचा मोठा फटका राज्याला बसण्याची शक्यता कमी असली तरी कमालीची दक्षता घेतली जात आहे. दर तासाला अधिक जोर पकडणारे हे चक्रीवादळ सध्या कोकण किनारपट्टीकडून गुजरातच्या दिशेने सरकत आहे. यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातही रायगड, मुंबई, पालघर जिल्ह्यात विशेष सतर्कता घेतली गेली आहे.
चक्रीवादळाचा महाराष्ट्रात
- सकाळी ८ च्या सुमारास महाराष्ट्रात प्रवेश केला.
- सिंधुदुर्गात पाऊस पडला
- दुपारी रत्नागिरी जिल्ह्यात आंबोळगडमध्ये चक्रीवादळ दाखल होणार आहे.
- मुंबईपासून ४५० किलोमीटर अंतरावर वादळ
कसा असेल चक्रीवादळाचा प्रवास-
- १४ मे लक्षद्वीप बेटांजवळ निर्माण होण्यास सुरुवात झाली, केरळ राज्यात मोठा पाऊस
- १५ मे गोवा किनारपट्टी प्रवास सुरु
- १६ मे चक्रीवादळात रुपांतर, कोकण किनारपट्टीवर प्रवेश
- १७ मे मुंबईजवळून गुजरातच्या दिशेने जाणार
- १८ मे राजकोटला पोहोचणार
- १९ मे राजस्थानमधून कराचीमार्गे पाकिस्तानकडे जाणार
सिंधुदुर्गात वादळाचे पडसाद-
- सिंधुदुर्गात रात्री २ पासून वादळी वारे वाहू लागले आहे.
- रात्री २ पासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज गेली
- तर किनारपट्टी भागात वाऱ्यासह पाऊस
कोल्हापूरात शेतीचे नुकसान, घरांची पडझड-
- तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यालाही बसला आहे.
- शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
- वादळी वाऱ्यांमुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात काही घरांची पडझड झाली आहे.
रत्नागिरीत तालुक्यातील १०४ गावांना सतर्कतेचा इशारा-
- आज पहाटेपासून राजापूर रत्नागिरी तालुक्यात कडक संचारबंदी करण्यात आली आहे.
- तर आज सायंकाळापासून गुहागर आणि दापोलीत संचारबंदी केली आहे.
- किनारपट्टी भागातील पाच तालुक्यांना सतर्कतेचा इशारा
- रत्नागिरी तालुक्यातील १०४ गावांना सतर्कतेचा इशारा
- शनिवारी मध्यरात्री रिमझिम पाऊस
रायगडच्या रुग्णालयात विशेष खबरदारी
- जिल्हातील सर्व कोरोना रुग्णालयात किमान दोन दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करण्यात आला आहे.
- प्रत्येक रुग्णालयात किमान दोन जनरेटर तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- या रुग्णालयांमध्ये महावितरणची यंत्रणा तैनात ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
- कोरोना उपचार घेणाऱ्या आणि ऑक्सिजनची गरज असणाऱ्या ग्रामीण रुग्णांना अलिबाग, माणगाव, पेण, पनवेल येथील रुग्णालयात हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
मुंबईत रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
- मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोरोना रुग्णालयातून रुग्णांना हलवले
- तसेच दहिसर आणि मुलुंडच्या कोरोना रुग्णालयातून ही रुग्णांना सुरक्षित हलविण्यात आलं.
- मुंबईत अनेक भागात सोसाट्याचा वारा-
- मुंबईतील शहर व उपनगरात रिमझिम पाऊस
- मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक दोन दिवसांसाठी वाहतुकाला बंद करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात अफवांचं थैमान, विश्वास न ठेवण्याचं आवाहन
- नाशिक जिल्ह्यात अनेक भागात रात्री पासून ढगाळ वातावरण
- चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्हा आपत्कालीन विभाग सतर्क
- जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
- नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.