Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता ‘टाटा’ समुहातील कंपनी ‘मेड इन इंडिया’ आयफोनचे उत्पादन करण्याची शक्यता!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
tata- iPhone

मुक्तपीठ टीम

देशातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक कंपन्यांपैकी एक म्हणजे टाटा कंपनी. जमशेदजी टाटा यांनी १८६८ मध्ये स्थापन केलेला, टाटा समूह हा एक जागतिक उपक्रम आहे, ज्याचे मुख्यालय भारतात आहे, ज्यामध्ये दहा वर्टिकलमध्ये ३० कंपन्या आहेत. टाटा कंपनीबाबत सध्या एक चर्चा सुरू आहे. स्मार्टफोन युजर्समध्ये आयफोनची क्रेझ किती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. यामुळेच टाटा सन्स लवकरच भारतात आयफोन तयार करू शकते. टाटा समूह यासाठी अॅपल इंकचे तैवानी सप्लायर विस्ट्रॉन कॉर्पशी चर्चा करत असल्याचे म्हटले जात आहे.

टाटा समूह आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरणार!

  • टाटा समूहाला भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात स्वावलंबी बनवायचे आहे. अशा परिस्थितीत टाटा ग्रुप आणि अॅपल इंक यांच्यातील हा करार झाल्यास आयफोन बनवणारी भारतीय कंपनी चीनला आव्हान देण्याचा मोठा प्रयत्न असेल.
  • यामुळे टाटा समूह आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरणार आहे.
  • त्याचबरोबर यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला तसेच भारतीय कंपनीला चालना मिळेल.

भारताची लोकसंख्या पाहता येथे भविष्यात आयफोनच्या मार्केटला मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन टाटा समूहाने आता भारतातच आयफोन निर्मिती करण्याचा विचार सुरू केला आहे. अॅपल इंक ही कंपनी भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या एकत्रित उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी ही कंपनी टाटा समूहाच्या संपर्कात असून लवकरच टाटा आणि अॅपल कंपनीमध्ये एक महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे.

भारताला याचा फायदा होऊन चीनला दणका बसणार?

  • भारतात आयफोन बनवल्यास देशाला अनेक फायदे होतील.
  • भारत आयफोन बनवणाऱ्या चिनी कंपन्यांना स्पर्धा देऊ शकेल आणि यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील चीनचे वर्चस्व कमी होण्यास मदत होईल.
  • यासोबतच अॅपल इंकनंतर इतर परदेशी कंपन्या देखील भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग स्थापन करण्यासाठी आपली पावले उचलतील, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवीन शक्ती मिळेल.
  • यासोबतच आयफोन भारतात बनवल्याने देशात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच, जेव्हा आयफोन भारतातच बनवले जातात, तेव्हा बाहेरून आयात करण्यावर कोणताही कर लागणार नाही आणि त्यामुळे भारतीय बाजारपेठेतही आयफोन स्वस्त मिळू शकतात.
  • टाटा समूहाने भारतात आयफोन निर्मिती सुरू केल्यास चिनी कंपन्यांना मोठा दणका बसू शकतो.
  • इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात भारताला चीनवर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही.

Tags: good newsiPhone ProductMade in India iPhonemuktpeethtata groupआयफोन उत्पादनघडलं-बिघडलंचांगली बातमीटाटा समुहमुक्तपीठमेड इन इंडिया आयफोन
Previous Post

 राज्यात ७३४ नवे रुग्ण, १,२१६ बरे! मुंबई २०९, नाशिक १४, नागपूर १० नवे रुग्ण !!

Next Post

चंद्रपुरातील वनप्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न, विसापूरच्या बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी!

Next Post
Visapur Botanical Garden

चंद्रपुरातील वनप्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न, विसापूरच्या बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!