Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंद्रपुरातील वनप्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न, विसापूरच्या बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Visapur Botanical Garden

मुक्तपीठ टीम

चंद्रपूर जिल्‍हयातील अपूर्ण असलेले महत्‍वाकांक्षी वनप्रकल्‍प तातडीने पूर्ण करण्यावर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भर दिला आहे. अशा प्रकल्पांमध्ये असलेल्‍या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी चंद्रपूरात त्यांनी आढावा बैठक घेतली. वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वनमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील महत्‍वपूर्ण वनप्रकल्‍पांचा आढावा घेतला. या प्रकल्पांपैकीच एक म्हणजे चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डन आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी २५ डिसेंबरला करण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक नियोजन करावे असे निर्देश वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

 Visapur Botanical Garden

विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी

चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण दि. २५ डिसेंबर रोजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी करण्‍याचे नियोजित आहे. ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पामुळे चंद्रपूर जिल्‍हयाला पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विशेष महत्‍व आहे. ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाला भेट देण्‍यासाठी देश-विदेशातील पर्यटक वर्षभर येत असतात. देशातील अत्‍याधुनिक बॉटनिकल गार्डन जवळच विसापूरमध्‍ये तयार होत असल्‍याने या गार्डनची देश-विदेशातील पर्यटकांनाही भुरळ पडणार आहे. वनसंपदा व वनेतर क्षेत्रातील जैविक संवर्धन साठा बघण्‍यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्‍यासक, विद्यार्थी या गार्डनला भेट देतील. या बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर आणि सभोवतालची गावे विकासाचे हब म्‍हणून पुढे येतील. त्‍यामुळे जिल्‍हयातील आदिवासी व ग्रामस्थांची जीवनमान उंचावण्‍यासाठी मदत होणार आहे. या बॉटनिकल गार्डनचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहे. बॉटनिकल गार्डन, कन्‍झर्वेशन झोन आणि रिक्रीएशन झोन अश्‍या तीन विभागामध्‍ये उद्यान तयार होत आहे. या बॉटनिकल गार्डनला भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नांव देण्‍यात येणार असल्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ताडोबात टायगर व बिबट सफारी सुरू करणार

ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प हे उत्‍तम पर्यटन स्‍थळ म्‍हणून जगाच्‍या नकाश्‍यावर यावे यादृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत. ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात टायगर व बिबट सफारी सुरू करण्‍याचा प्रकल्‍प अपूर्णावस्‍थेत आहे. टायगर व बिबट सफारीच्‍या माध्‍यमातून येथे येणा-या पर्यटकांना वन्‍यजीव दर्शनाची विशेष सोय उपलब्‍ध होणार आहे. यादृष्‍टीने देखील जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.

बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करा

चंद्रपूर जिल्‍हयातील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा रोजगार निर्मितीच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण प्रकल्‍प आहे. या प्रकल्‍पाच्‍या ठिकाणी बांबु कामावर फायर रिटारडंट पॉलीश करणे, आग प्रतिबंधक योजनेनुसार कार्यशाळा इमारत व स्‍वयंपाकगृह इमारतीचे बांधकाम करणे तसेच विद्युत विषयक कामे प्रलंबित आहेत. यासाठी नुकताच १४ कोटी रू. निधी मंजूर झालेला आहे. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

वनअकादमी पूर्ण क्षमतेने पुढे नेण्‍याबाबत कार्यवाहीचे निर्देश

चंद्रपूर येथील वनप्रशासन विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी अर्थात वनअकादमीशी संबंधित कामांना गती देत पुढे नेण्‍याची आवश्‍यकता आहे. वनअकादमीत आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण केंद्राच्‍या निर्मितीची आवश्‍यकता आहे. अकादमीतील रिक्‍त पदांची भरती करणे सुध्‍दा गरजेचे आहे. वनअकादमीचे वनविद्यापीठात रूपांतर करण्‍याच्‍या दृष्‍टीने समिती नेमून त्‍यादृष्‍टीने जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. देशातील अत्‍याधुनिक अशा स्‍वरूपाची ही वनअकादमी सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण व्‍हावी असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वरील विषयांवर विस्तृत चर्चा झाली. हे प्रकल्‍प जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कालबध्‍द कार्यक्रम तयार करण्‍याचे निर्देश वनमंत्र्यांनी यावेळी दिले. दर पंधरा दिवसांनी चंद्रपूरला येवून सचिवांनी या प्रकल्‍पांबाबत आढावा घेण्‍याचे निर्देशही त्‍यांनी दिले.

 


Tags: Chandrapur Forest Projectgood newshappeningsmuktpeethPrincipal Chief Conservator of Forests YLP RaoPrincipal Secretary of Forests Venugopal ReddyVisapur Botanical Gardenघडलं-बिघडलंचंद्रपुर वनप्रकल्पचांगली बातमीप्रधान मुख्‍य वनसंरक्षक वायएलपी रावमुक्तपीठवनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीविसापूर बॉटनिकल गार्डन
Previous Post

आता ‘टाटा’ समुहातील कंपनी ‘मेड इन इंडिया’ आयफोनचे उत्पादन करण्याची शक्यता!

Next Post

मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्सने बनवलेल्या तारागिरी युद्धनौकेचे आज जलावतरण

Next Post
Taragiri Warship

मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्सने बनवलेल्या तारागिरी युद्धनौकेचे आज जलावतरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!