मुक्तपीठ टीम
कधी खेकड्यांमुळे धरण फुटल्याचा दावा तर कधी हाफकिनला माणूस मानून दिलेल्या आदेशाचा आरोप…अशा एक नाही अनेक वक्तव्यांमुळे वादात सापडणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिंदे गटाच्या हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान धाराशिवमध्ये बोलताना ते म्हणाले की, “सत्तांतर झाल्यावरच तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली का? विरोधकांवर टीका करताना केलेल्या या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक राजकारण करतायत…
- शिवसेनेकडून आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढत आहेत.
- त्यालाच उत्तर म्हणून शिंदे गटाकडून हिंदूगर्वगर्जना कार्यक्रम घेतले जात आहेत.
- यावेळी धाराशिवमध्ये बोलत असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत असल्याचं मंत्री सावंत यांनी म्हटलं.
- ते म्हणाले की, आम्हाला ओबीसीमधून, एसटीमधून आरक्षण हवंय अशा मागण्या होत आहेत.
- कोण आहेत हे? यांच्या मागचा कर्ता करविता कोण आहे?
- तुम्हा-आम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे.
- सगळ्यांना हे माहितीय पण कुणी बोलत नाही.
सत्तांतर झाल्यानंतर लगेच तुम्हाला आरक्षणाचा खाज सुटली…
- तानाजी सावंतांनी देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं.
- ते ब्राह्मण होते, त्यांना त्रास दिला, पण त्यांनीच मराठ्यांची झोळी भरली, असे सावंत म्हणाले.
- महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना मंत्री सावंत म्हणाले की, “दोन वर्षे आरक्षण गेल्यानंतर तुम्ही गप्प होतात.
- आता सत्तांतर झाल्यानंतर लगेच काहींना आरक्षणाचा खाज सुटली.
- आम्हाला आरक्षण पाहिजेच. मलाही पाहिजे.
- माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण पाहिजे.
- आम्ही ते घेतल्याशिवाय सोडणार नाही.
- आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री २०२४ च्या आत आपल्याला पाहिजे तसं, टिकावू आरक्षण दिल्याशिवाय
- स्वस्थ बसणार नाहीत हे वचन देतो.
तानाजी सावंतांच्या वक्तव्यावरून शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत!!
- शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक कायदेशीर प्रयत्न करत आहेच.
- काही दिवसांपूर्वीच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते.
- या समितीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.
- ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.
- शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
- काही जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मोर्चाचे इशारे देण्यात आले आहेत.
- अशातच आता तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठा समाजात रोष निर्माण होण्याची भीती आहे.