मुक्तपीठ टीम
लोकांची जीवनशैली वेगवान झाली आहे. धावपळीच्या जीवनात लोक अनेक प्रकारच्या गंभीर आजारांनी घेरले आहे. हृदयविकाराचा झटका लोकांमध्ये वाढत आहे आणि हा आजार आता तरुणांमध्ये अधिक दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, तुमचे हृदय आजारी आहे की नाही हे देखील तपासले पाहिजे. आता काही सेकंदात हृदयाची स्थिती जाणून घ्या. अगत्सा कंपनीने SanketLife नावाचे पोर्टेबल ECG मशीन बाजारात सादर केले आहे. या उपकरणाच्या मदतीने घरी बसल्या काही सेकंदात ECG निकाल मिळवता येईल. हे उपकरण स्मार्ट फोनला जोडून कुठेही ECG अहवाल पाठवू शकता.
९९.७% पर्यंत अचूक निकाल
- संकेत लाइफ 2.0 डिव्हाइससह, ९९.७% पर्यंत अचूक परिणाम मिळतात.
- हे क्लिनिक आणि वैयक्तिक दोन्ही वापरले जाऊ शकते.
- यासाठी इंटरनेटची गरज नाही.
- ते वापरण्यासाठी सर्वप्रथम संकेत लाइफ अॅप मोबाईलवर डाउनलोड करावे लागेल.
- यानंतर डिव्हाइसला स्मार्टफोनशी कनेक्ट करावे लागेल.
- आता दिलेल्या बिंदूवर त्यांच्या अंगठ्याचा ठसा लावावा लागेल.
- यानंतर युजर्स चाचणी आणि अहवाल तयार करू शकतात.
- प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, कंपनीने लीड्स दिली आहेत.
- चाचणी दरम्यान याचे अचूक परिणाम मिळाले आहेत.
- यासाठी अॅप शुल्क भरावे लागणार नाही.
- आता पोर्टेबल ईसीजी यंत्राच्या मदतीने २४ तास घरात बसून हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवता येणार आहे.