मुक्तपीठ टीम
शेतकरी आंदोलनाविरोधात समाज माध्यमांमध्ये व्हायरल केल्या जाणाऱ्या अनेक पोस्ट विरोधातील, दिशाभूल करणाऱ्या असतात. त्यामुळे आता शेतकरी नेत्यांनीही या माध्यमांवरील सक्रियता वाढवून भाजपाशी या रणभूमीवरही सामना करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी चळवळीतील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी बांदा येथे स्वीकारलं की ते समाज माध्यमांमध्ये सरकारविरोधात लढताना कमी पडतात. अपयशी ठरत आहेत. पण त्यांच्याकडे ट्विटर असेल तर आमच्याकडे उत्तर देण्यासाठी ट्रॅक्टर आणि टँकर आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी तरुण शेतकऱ्यांना सोशल मीडियावरील सक्रियता वाढवण्याचे आवाहन केले.
राकेश टिकैत यांचं सरकारला आव्हान
- विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे आचारसंहितेनंतर ठरवणार आहेत.
- लढायचे की नाही हे अजून ठरलेले नाही.
- जो ज्या चष्म्याचा रंगाने बघेल, त्याला तेच दिसेल.
- त्यांचा हेतू निवडणुका आहे, म्हणून ते आम्हाला निवडणुकांशी जोडत आहेत, परंतु आमचा हेतू देश वाचवणे आहे.
- केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशात फिरत आहोत.
- शेतकऱ्यांनी कोणती घोषणा द्यावी आणि त्यांनी कोणती उपासना पद्धत स्वीकारावी हे सरकार सांगेल का, त्यांना संविधानात हा अधिकार मिळाला आहे.
- उद्योगपतींचे सरकार भाकरी तिजोरीत बंद करत आहे.
- सरकार तीन कृषी कायदे करून तिजोरीत भाकरी बंद करण्याचा प्रयत्न करत आहे.
- भाकरी ही बाजाराची गोष्ट नसून प्रत्येकाच्या गरजेची गोष्ट आहे.
- सरकारला मोठ्या कंपन्या चालवत आहे.
- सर्व संसाधने त्यांना एका क्षणात विकली जात आहेत.
- रेल्वे, विमानतळ, एलआयसी, भारत पेट्रोलियम सर्व विकण्यास तयार आहेत.
- संयुक्त किसान मोर्चा या विक्रीला विरोध करत आहे.
- बेरोजगारीला सामोरे जाणाऱ्या देशातील कोट्यवधी तरुणांना या लढ्यात पुढे यावे लागेल, त्यांना पुढे येऊन या लढ्यात सामील व्हावे लागेल.