Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आघाडीच्या राजकारणाचा फटका महिला आयोगाला!”

साकीनाका अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीका, सोमवारी अहवाल

September 5, 2026
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
NCW at sakinaka

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवींच्या नेतृत्वाखालील टीमने मुंबईतील साकीनाका भागातील घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी राज्य सरकारवर टीकेच्या फैरी झाडल्या, “राज्य सरकार आघाडीच्या राजकारणात अडकले आहे. त्यामुळेच राज्यात दोन वर्षे होत आली तरी महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली नाही!” पोलीस आयुक्तांच्या विधानाचा दाखला देत चंद्रमुखी देवींनी पोलिसांवर टीकेची झोड उठवली.

 

राष्ट्रीय महिला आयोगाचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

  • महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाच्या स्थापनेत एवढा उशीर का होत आहे?
  • महिला आयोग आवश्यक असूनही का स्थापन केलं जात नाही हे कळत नाही.
  • हा महिलांशी संबंधित आयोग आहे.
  • अतिशय संवेदनशील विषय आहे.
  • लवकरात लवकर आयोग स्थापन करायला हवा.
  • राज्य सरकार आपल्या आघाडीच्या राजकारणात अडकले आहे.
  • त्यामुळेच त्यांना महिला आयोगाच्या स्थापनेत रस नाही.
  • या संस्थांचं पुनर्गठन करावं, त्यात सदस्य नियुक्त करावेत यामध्ये सरकारला काडीचा रस नाही.

 

पोलिसांच्या भूमिकेवर टीकेची झोड

• मुंबईत भररस्त्यात महिलेवर बलात्कार, ही अत्यंत धक्कादायक घटना आहे.
• त्यामुळे आम्ही सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही असं पोलीस आयुक्तांचं विधान निंदनीय आहे. पोलीस सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही हे आम्हालाही कळतं.
• पण पोलिसांचा एक धाक असतो, पोलिसांची दहशत असते, त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होत असतो, तो निर्माण करायला हवा.
• ते न करता अशी विधान करणं चुकीचं आहे.
• महिलांवर अत्याचार होत आहेत. याचा अर्थ गुन्हेगारांचं मनोबल वाढलं आहे.
• त्यांच्यावर कायद्याचा धाक राहिला नाही. पोलिसांचा काही धाक नाही. त्यामुळेच ते अशी कृत्य करत आहेत.

 

राज्य महिला आयोग नसल्याने पोलिसांवर अवलंबून!

  • राज्य महिला आयोग ही महत्वाची संस्था आहे.
  • पण दोन वर्षापासून राज्यात महिला आयोगाची स्थापनाच झालेली नाही.
  • राष्ट्रीय महिला आयोगाला कामानिमित्ताने महिला आयोगाशी संपर्क साधावा लागतो.
  • पण इथे महिला आयोगच नसल्याने पोलिसांवर अवलंबून राहावं लागतं.
  • कोरोना काळात देशातील सर्व राज्यांतील महिला आयोगाशी संपर्क साधला.
  • त्या राज्यातील पीडित महिलांना मदत केली.
  • पण महाराष्ट्रात आयोगच नसल्याने आम्हाला त्यांचं सहकार्य मिळू शकलं नाही.

 

सोमवारी राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षांना, केंद्र सरकारला अहवाल देणार

  • पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.
  • महिलांच्या चारित्र्यावर बोलू नये.
  • महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत.
  • अशा घटनांनी महिलांनी घाबरून जाऊ नये.
  • दुर्देवाने काही घटना घडल्यास महिलांनी न घाबरता त्याची तक्रार करावी.
  • साकीनाका प्रकरणाची माहिती घेतली आहे.
  • सोमवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि केंद्र सरकारला अहवाल देणार आहोत.

Tags: national women commissionsakinakaराष्ट्रीय महिला आयोगसाकीनाका
Previous Post

“भाजपाचं ट्विटर, तर शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर!”

Next Post

गुजरातेतही भाजपा श्रेष्ठींचं धक्कातंत्र! चर्चेतील चारही नावे बाजूुला…भूपेंद्र पटेल नवे मुख्यमंत्री!

Next Post
Bhupendra Patel Gujarat cm

गुजरातेतही भाजपा श्रेष्ठींचं धक्कातंत्र! चर्चेतील चारही नावे बाजूुला...भूपेंद्र पटेल नवे मुख्यमंत्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!