Tag: डॉ. राजेंद्र शिंगणे

“सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देताना ग्राहकांची फसवणूक नको!”

मुक्तपीठ टीम सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देत असतांनाच ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जावी यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सहकार्य केले जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पशु संवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार उपस्थित होते. महा ऑर्गनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) महाराष्ट्र राज्य  पुणे यांच्या समवेत सेंद्रिय अणि विषमुक्त  शेतीविषयक अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबधित विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पदुमचे प्रधान सचिव जे.पी गुप्ता, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव विजय सौरभ,आयुक्त डॉ. परिमल सिंग याच्यासह पदुम आयुक्त, कृषि आयुक्त, सहकार आयुक्त, एफ. एस. एस. ए. आय. च्या संचालक श्रीमती प्रिती चौधरी, मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळ, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, बाजारात अनेक अन्न पदार्थ सेंद्रिय पदार्थ म्हणून विकले जातात मात्र ज्याच्या वेष्टनावर सेंद्रिय अन्नपदार्थ लिहिले असते  त्यात तसे पदार्थ आहेत अथवा नाही याची खात्री नसते, त्यामुळे या पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्न सुरक्षा व मानदे नियमन तयार केले आहे. यात जे अन्न पदार्थ सेंद्रिय अन्नपदार्थ म्हणून पॅक करुन विक्री केली जाते त्या प्रत्येक पदार्थाला NPOP सर्टिफिकेशन यंत्रणेचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.  तसेच यावर 'जैविक भारत' चा लोगो स्पष्टपणे छापलेला असावा, असे नियम आहेत. सदर नियमांची अन्न व औषध प्रशासना (FDA) मार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून नकली सेंद्रीय उत्पादनावर कारवाई केली जाईल. जनतेला अधिकृत सेंद्रिय उत्पादने मिळणेबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी सांगितले. राज्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक – कृषिमंत्री दादाजी भुसे सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. ...

Read more

बुलढाणा जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

मुक्तपीठ टीम बुलढाणा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिले. बुलढाणा जिल्ह्याचे ...

Read more

“दुग्धजन्य आणि इतर अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी”: डॉ. राजेंद्र शिंगणे

मुक्तपीठ टीम राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळणे गरजचे आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व ...

Read more

बुलढाण्यातील दूध सहकारी संस्थेच्या मागण्यांबाबत सकारात्मक – सुनील केदार

मुक्तपीठ टीम सहकारी दूध उत्पादक संघांबाबत शासन नेहमीच सकारात्मक असून बुलढणाजिल्ह्यातील जिजामाता देऊळगाव राजा तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी ...

Read more

“रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे”

मुक्तपीठ टीम राज्यातील रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे ...

Read more

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या पूर्वतयारीचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री ...

Read more

बुलडाण्यातील प्रसेनजीत पाटील राष्ट्रवादीत स्वगृही परतले

मुक्तपीठ टीम कापूस पणन महासंघाचे संचालक तथा जळगाव जामोद कृ. उ. बा. समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील यांनी आज आपल्या असंख्य ...

Read more

“लहान मुलांच्या उपचारांसाठी राज्यात स्वतंत्र व्यवस्था उभारणार”

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम ...

Read more

राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन

मुक्तपीठ टीम   राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याच प्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ...

Read more

“राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन सुरू” – डॉ. राजेंद्र शिंगणे

मुक्तपीठ टीम   राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्यादृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य ...

Read more

ताज्या बातम्या

error: Content is protected !!