Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बुलढाणा जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पाठपुराव्याला यश

April 28, 2022
in सरकारी बातम्या
0
Jayant Patil On Buldhana Projects

मुक्तपीठ टीम

बुलढाणा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिले. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या  प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील व बुलढाणा जिल्ह्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी जलसंपदा विभाग, उर्जा विभाग, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी व बुलडाणा जिल्ह्यातील संबधित अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

बौद्ध स्तुपाचे जतन व संवर्धन

जिगाव उपसा सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भोन या गावात पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार इ.स.वी.सन पूर्व तिसऱ्या शतकातील (सुमारे ३०० वर्षांपूर्वीच्या) बौध्द स्तुपाचे अवशेष सापडले आहेत. या स्तुपाचे तसेच इथे आढळलेल्या इतर प्रचीन वास्तूंचे आणि सामुग्रीचे जतन व संवर्धन करण्यात यावे, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

पेनटाकळी प्रकल्पाला बंदिस्त कालवा             

पेनटाकळी प्रकल्पाचा मुख्य कालव्याला अस्तरिकरण करण्या एवजी आर सी सी ट्रॅफ (बंदिस्त कालवा) तयार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.            

पेनटाकळी हा प्रकल्प हा मोठा प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत गोदावरी खोऱ्यातील पैनगंगा उपखोऱ्यात बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीवर पेनटाकळी गावांच्या वरिल बाजुस बांधण्यात आला आहे. अस्तरिकरण असलेल्या मुख्य कालव्याऍवजी आर सी सी ट्रॅफ चा पर्याय तांत्रिक दृष्ट्या योग्य असल्याबाबत विभागाने कळविले आहे. तसा प्रस्ताव नियामक मंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

पुनर्वसित गावठाण पार्डी, ता. लोणार करिता वीज जोडणी            

बोरखेडी मिश्र संग्राहक ल.पा. योजना लोणार तालुका जि. बुलडाणा या योजनेच्या बुडीत क्षेत्रात मौ. पार्डी हे  गावठाण येते. या प्रकल्पांतर्गत नविन पुनर्वसित गावठाणासाठी पाण्याच्या नविन वीज कनेक्शनसाठी उर्जा विभागाने सहकार्य करावे, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.            

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आलवेडी आणि अरकचेरी या लघु पाटबांधारे प्रकल्पांना, तसेच देऊळगांवराजा येथिल खडकपुर्णा प्रकल्पास पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासंबधी चर्चा झाली. हे  प्रस्ताव काही त्रुटींच्या पूर्ततेसाठी प्रलंबित आहे.  सदर त्रुटींची पूर्तता करून सर्व प्रकल्पांना गती देण्याची विनंती डॉ. शिंगणे यांनी केली आहे.


Tags: buldhanadr. Rajendra Shinganejayant patilMaharahstraजंयत पाटीलडॉ. राजेंद्र शिंगणेप्रलंबित प्रकल्पबुलढाणा
Previous Post

“उत्तरप्रदेशात भोंगे उतरवणारे योगी, महाराष्ट्रात सत्तेचे भोगी!” राज ठाकरेंच्या ट्वीटने वाद

Next Post

अखेर राज ठाकरेंची सभा होणारच! पण…

Next Post
Raj Thackeray

अखेर राज ठाकरेंची सभा होणारच! पण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!