मुक्तपीठ टीम
धुळ्यातील शिरपूरमध्ये सोनगीर पोलिसांनी तलवारी जप्त करत चार जणांना अटक केली आहे. पेट्रोलिंग करत असताना एका गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत तब्बल ८९ तलवारी आणि खंजीर आढळून आल्या. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख १३ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे. दरम्यान इतक्या मोठ्याप्रमाणात तलवारी कशाला? कुणाला दंगली घडवायची आहे? असा प्रश्न भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.
याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती धुळ्याचे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली. त्यांची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद शरीफ मोहम्मद शफीक (३५), शेख इलियास शेख लतीफ (३२), सय्यद नई सय्यद रहीम (२९) आणि कपिल दाभाडे (३५) या चार आरोपींना अटक केली आहे. हे चौघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
धुळ्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याबाबत भाजपा नेते राम कदम यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान ? राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे.. त्या राजस्थान मधून जालना जाणार्या ९० तलवारी ताब्यात घेतल्या. याआधीच पुणे येथे तलवारी औरंगाबाद येथे जात असताना ताब्यात घेतल्या. कॉंग्रेस ह्या षड्यंत्र सामील आहे का ?
ठाकरेसरकार ह्याच्या मुळाशी जाऊन चौकशी करणार का ?
महाराष्ट्रात #दंगली घडविण्याचे कारस्थान ?
जेथे #कॉंग्रेसचे सरकार आहे..
त्या #राजस्थान मधून #जालना जाणार्या 90 तलवारी ताब्यात.
याआधीच #पुणे येथे तलवारी औरंगाबाद येथे जात असताना ताब्यात..
काय #कॉंग्रेस ह्या षड्यंत्र सामील आहे का ? #ठाकरेसरकार ह्याच्या मुळाशी— Ram Kadam (@ramkadam) April 28, 2022