मुक्तपीठ टीम
चीनमधल्या वुहानमधून कोरोनाचा उद्रेक झाला. यादरम्यान चीनने अनेक खोटे दावे केले आहेत. आताही चीनचा आणखीन एक खोटारडेपणा उघड झाला आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या शास्त्रज्ञाचा हवाला देऊन चीनी माध्यमांनी बातम्या चालवल्या होत्या. मात्र जेव्हा त्यांचा खोटारडेपणा सर्वांसमोर आला तेव्हा त्यांनी माफी मागितली.
चीनमध्ये व्हायरल होत असलेल्या अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा करण्यात आला की, WHO ने कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी एक सल्लागार समिती गठीत केली आहे. यामध्ये सहभागी स्वित्झर्लंडमधल्या विल्सन एडवर्ड्सने तपासाविरोधात निवेदन दिले आहे.
Looking for Wilson Edwards, alleged 🇨🇭 biologist, cited in press and social media in China over the last several days. If you exist, we would like to meet you! But it is more likely that this is a fake news, and we call on the Chinese press and netizens to take down the posts. pic.twitter.com/U6ku5EGibm
— Embassy of Switzerland in Beijing (@SwissEmbChina) August 10, 2021
विल्सनची फेसबूक पोस्ट चीनी वृत्तपत्रात प्रकाशित
- आघाडीच्या चीनी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बनावट बातम्यांनुसार, विल्सनने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली.
- यामध्ये त्यांनी कोरोनाच्या उत्पत्तीवरच्या तपासाला राजकीयदृष्ट्या तपास केल्याचं म्हटलं आहे.
- विल्सन म्हणतात की, याचा वापर चीनच्याविरोधात केला जात आहे आणि ते याबद्दल खूप चिंताग्रस्त आहेत.
स्विस दुतावासाकडून पितळ उघड - चीनी माध्यमांमध्ये ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर स्विस दुतावासाने त्यांच्याकडे अशी कोणतीही व्यक्ती काम करत नसल्याचं सांगितलं आहे.
- दुतावासाने सोशल मीडियावर म्हटले आहे की, स्वित्झर्लंडमध्ये या नावाचा एकही शास्त्रज्ञ नाही.
- आम्ही खूप शोध घेतला, पण विल्सन एडवर्ड्स नावाच्या शास्त्रज्ञाच्या नावाची नोंद आणि लेख सापडला नाही.
- तुमच्याकडे त्यांचा तपशील असल्यास शेअर करा.
- आम्ही त्यांना भेटू इच्छितो. तशी कोणतीही व्यक्ती इथे नाही.
- स्वित्झर्लंडने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्याकडे या नावाचा कोणताही शास्त्रज्ञ नाही.
- आम्ही चीनला आग्रह करतो की, ही स्टोरी काढून टाका.
- सीजीटीएन, पीपल्स डेली आणि चायना डेलीने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.