मुक्तपीठ टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूनेला अटक वॉरंट जारी केले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सळे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ‘हे मुघलांचे राज्य आहे. महिलांचा मानसन्मान करणे ही यांची संस्कृती नाही’ असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
केंद्र सरकार हे मुघलांचं
- सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत ही घाणाघाती टीका केली.
- केंद्र सरकार हे मुघलांचं आहे.
- छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नाही.
- छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मानच केला आहे.
- या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे.
- अर्थात हे मुघलांचं राज्य चाललं आहे.
- महिलांचा मानसन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही.
- या देशातील महिला अबला आहे असं त्यांना वाटतं. याच महाराष्टातील मुली मग ती सावित्री असू दे अहिल्या देवी किंवा राणी लक्ष्मीबाई… यांचं कर्तृत्व हे सरकार विसरलं आहे.
- म्हणून सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- पण महाराष्ट्राच्या लेकी या अत्याचाराच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होती.
- कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा घ्या
- लखीमपूरच्या हिंसेच्या विरोधात आम्ही हा बंद पुकारला आहे.
- शेतकऱ्यांना चिरडले जाते हे दुर्देव आहे.
- माणुसकी राहिली नाही.
- पूर्वी राजकारणात माणुसकी होती.
- केंद्राने ही माणुसकी संपवली आहे.
- शेतकऱ्यांचा खून केला आहे.
- त्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे.
- शेतकऱ्यांना चिरडण्यात येत असल्याचा व्हिडीओ पाहिला.
- त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारला आहे.
- ही सत्तेची मस्ती आहे.
- तुम्ही तो व्हिडीओ बघा.
- यात माणुसकी दिसते.
- ही क्रूरता आहे.
- उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत चुकीची आहे.
- नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रातील मंत्र्याने राजीनामा द्यावा.