Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारलं! सिरीजमार्फत देशाच्या तरूणाईचे मन दूषित केल्याचा आरोप

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ekta Kapoor

मुक्तपीठ टीम

टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन म्हटली जाणारी एकता कपूर तिच्या शोजमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, यासोबतच तिचे वादांशीही जुने नाते आहे. आता एकताला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारल्याची बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्माती एकता कपूरला तिच्या ‘थ्री एक्स’ वेब सिरीजमधील आक्षेपार्ह मजकुरासाठी फटकारले आहे.

या आक्षेपार्ह मजकूराबद्दल फटकारत, असे म्हटले आहे की, “ते या देशातील तरुण पिढीचे मन दूषित करत आहे.” एकताने तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट बालाजी’ वर प्रसारित केलेल्या वेब सीरिजमध्ये सैनिकांचा अपमान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.”

वेब सिरीजमार्फत तरुण पिढीचे मन दूषित केले जात आहे

  • न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, “काही तरी केले पाहिजे. तुम्ही या देशातील तरुण पिढीचे मन दूषित करत आहात.
  • ओटीटी कंटेंट सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना नक्की काय दाखवत आहात?…उलट तरुणांची मने दूषित करत आहात.

‘या’ देशात निवडीचे स्वातंत्र्य आहे!

  • एकता कपूरची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, परंतु हे प्रकरण लवकरच सुनावणीसाठी सूचीबद्ध होईल अशी आशा नाही.
  • ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही अशाच एका प्रकरणात एकताला संरक्षण दिले होते.
  • रोहतगी म्हणाले की, मालिकेतील मजकूर सदस्यतेवर आधारित आहे आणि या देशात निवडीचे स्वातंत्र्य आहे.
  • यावर न्यायालयाने जनतेला कोणता पर्याय दिला आहे, अशी विचारणा केली.

बिहारमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती

  • बिहारच्या बेगुसराय येथील न्यायालयाने माजी सैनिक शंभू कुमार यांच्या तक्रारीवरून एकता कपूरच्या विरोधात वॉरंट जारी केले होते.
  • शंभू कुमार यांनी २०२० मध्ये याबद्दल तक्रार दाखल केली होती.
  • ‘थ्री एक्स’ (सीजन-२) मध्ये सैनिकाच्या पत्नीचा संबंध असलेली अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवली होती, असा आरोप त्यांनी केला होता.

Tags: 3X Web SeriesEkta KapoormuktpeethOTT platformSupreme CourtTV Industryएकता कपूरओटीटी प्लॅटफॉर्मघडलं-बिघडलंटीव्ही इंडस्ट्रीथ्री एक्स वेब सिरीजमुक्तपीठसर्वोच्च न्यायालय
Previous Post

मुरजी पटेलांची उमेदवारी वादात!! ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला आक्षेप

Next Post

ड्राय क्लीनिंग रोबोट: सोलर पॅनलवरील साचलेली धूळ दूर करणार, सौर ऊर्जा निर्मिती वाढवणार!

Next Post
dry cleaning robot

ड्राय क्लीनिंग रोबोट: सोलर पॅनलवरील साचलेली धूळ दूर करणार, सौर ऊर्जा निर्मिती वाढवणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!