Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुरजी पटेलांची उमेदवारी वादात!! ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला आक्षेप

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Murji Patel

मुक्तपीठ टीम

अंधेरी मतदारसंघाची पोटनिवडणूक ही राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीवर असताना आता नवा ट्विस्ट या निवडणुकीला आला आहे. भाजपाकडून निवडणुकीच्या मैदानात मुरजी पटेल यांना उतरवण्यात आले आहे. शुक्रवारी भाजपाच्या बड्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आता मुरजी पटेल यांची उमेदवारी वादात सापडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला असून त्यांच्यावर विविध आरोपही करण्यात आले.

आयोगाने पटेलांचा अर्ज कसा स्वीकारला?

  • या निवडणुकीतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पर्यायी उमेदवार संदीप राजू नाईक यांनी शनिवारी याबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती.
  • यावेळी त्यांनी उमेदवार म्हणून पटेल यांच्या अर्जावर आक्षेप घेतला.
  • पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले, आम्ही आज निवडणूक आयोगासमोर ५ आक्षेप घेतले आहेत.
  • पहिला म्हणजे, मुरजी पटेल यांना शासनाच्या आदेशानुसार ६ वर्ष निवडणूक लढविता येत नाही.
  • त्यांना बाद करण्यात आलं आहे.
  • उच्च न्यायालयानेही त्यांना जातीच्या कागदपत्रांमध्ये दोषी ठरवलं आहे.
  • तसंच सर्वोच्च न्यायालयानेही यावर शिक्कामोर्तब केला आहे. मग आयोगाने त्यांचा अर्ज कसा स्वीकारला? असा प्रश्न नाईक यांनी विचारला.

पटेल यांचा मतदानाचा अधिकार आयोगाने अद्याप का काढून घेतला नाही?

  • मुरजी पटेल यांना बाद केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागितली.
  • मला ज्या तरतुदींनुसार बाद करण्यात आलं होतं, ती तरतुद रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.
  • त्यावर उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता.
  • त्यांना तो अर्ज मागे घ्यावा लागला होता.
  • या याचिकेचा उल्लेख ही या अर्जामध्ये नाही.
  • मुरजी पटेल यांचा मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाने अद्याप का काढून घेतला नाही? असा प्रश्न नाईक यांनी विचारला.
  • जर त्यांचा अधिकार काढून घेतला असेल तर त्याबाबत आम्हाला माहिती द्यावी अशी मागणीही त्यांनी आयोगाकडे केली.

नाईक यांचे पटेल यांच्यावर गंभीर आरोप-

  • मुरजी पटेल यांच्यावर बोगस चेक देण्याबाबत खटला आहे.
  • तो त्यांनी लपविला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रलंबित खटल्यांची माहिती वृत्तपत्रांमधून प्रसारित करावी लागते.
  • ते ही पटेल यांनी केलेलं नाही.

मग त्यानंतरही त्यांचा अर्ज कसा स्वीकारला?

  • एमआयडीसीमध्ये पात्र लोकांच्या घरावर त्यांनी डल्ला मारला आहे.
  • कित्येक लोकांना बेघर केले आहे, असा आरोप नाईक यांनी पटेला यांच्यावर केला आहे.

Tags: Andheri constituency by-electionBJPmuktpeethMurji PatelRituja Ramesh LatkeShivSena Uddhav Balasaheb ThackerayUddhav Thackerayअंधेरी मतदारसंघ पोटनिवडणूकउद्धव ठाकरेऋतुजा रमेश लटकेभाजपामुक्तपीठमुरजी पटेलशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Previous Post

रविवारी दिवाळी खरेदी? आधी रेल्वे मेगाब्लॉक तपासा…

Next Post

सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारलं! सिरीजमार्फत देशाच्या तरूणाईचे मन दूषित केल्याचा आरोप

Next Post
Ekta Kapoor

सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारलं! सिरीजमार्फत देशाच्या तरूणाईचे मन दूषित केल्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!