Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीएए आंदोलकांना वसुलीच्या नोटिस, सर्वोच्च न्यायालयानं उत्तरप्रदेश सरकारला फटकारलं! “रद्द करा, नाही तर आम्ही रद्द करतो!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Yogi adityanath And Supreme court

मुक्तपीठ टीम

नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच CAAला विरोध करणाऱ्या आंदोलकांना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप करत उत्तर प्रदेश सरकारने वसुलीच्या नोटिसा जारी केल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारला वसुलीच्या नोटिसा मागे घेण्याची शेवटची संधी दिली आणि जर तसे केले नाही तर त्या आम्हीच कायदेशीररित्या रद्द करू, असा इशारा दिला आहे.

 

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने नोटिसा मागे घेण्याची कारवाई न केल्याबद्दल राज्य सरकारला फटकारले आणि नोटिसा मागे न घेतल्यास त्या रद्द करण्यात येतील, असे सांगितले. डिसेंबर २०१९ मध्ये सुरू झालेली कारवाई सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्याच्या विरोधात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

 

न्यायालयाने सांगितले की, उत्तर प्रदेश सरकारने नोटीस मागे घ्यावी अन्यथा आम्ही या न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ती रद्द करू. राज्य सरकारला कायद्यानुसार योग्य प्रक्रिया करण्याचे निर्देश देताना न्यायालयाने सांगितले की, कृपया याची चौकशी करा, आम्ही १८ फेब्रुवारीपर्यंत संधी देत ​​आहोत.आंदोलक म्हणून सहा वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या एका ९४ वर्षीय व्यक्तीसह नव्वदी ओलांडलेल्या दोन वृद्धांनाही वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्याचे याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणणण्यात आले आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • डिसेंबर २०१९मध्ये, उत्तर प्रदेश सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात आंदोलकांना सार्वजनिक मालमत्तेचे कथित नुकसान केल्याबद्दल वसुलीसाठी नोटिसा बजावल्या होत्या.
  • उत्तर प्रदेश सरकारने कथित आंदोलकांवर वसुली कारवाई करताना स्वत: तक्रारदार, वकील आणि न्यायाधीश यांचे काम केले आहे.
  • शिवाय, कायद्याचे उल्लंघनही केले आहे.
  • उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता गरिमा प्रसाद यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, आठशेहून अधिक आंदोलकाविरुद्ध १०० हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, त्यांच्याविरुद्ध २७४ वसुलीच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.
  • ते म्हणाले की २३६ मध्ये वसुलीचे आदेश पारित करण्यात आले, तर ३८ प्रकरणे बंद करण्यात आली.

Tags: Chief Minister Yogi AdityanathSupreme CourtUttar Pradeshउत्तरप्रदेशमुख्यमंत्री योगी आदित्यनाथसर्वोच्च न्यायालय
Previous Post

“भाजपाची वाटचाल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराने”

Next Post

कुपोषणमुक्त मुंबईसाठी ७१ नागरी बाल विकास केंद्रे कार्यान्वित

Next Post
71 Urban Child Development Centers for Malnutrition Free Mumbai

कुपोषणमुक्त मुंबईसाठी ७१ नागरी बाल विकास केंद्रे कार्यान्वित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!