Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भाजपाची वाटचाल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराने”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

February 12, 2022
in घडलं-बिघडलं
0
"भाजपाची वाटचाल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराने" विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन https://muktpeeth.com/chandrakant-patil-unveiled-statue-of-pandit-deendayal-upadhyay/

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या गरीब कल्याणाच्या योजना पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरील सेवेचे संस्कार हे दीनदयाळजींच्या विचारांमुळे झाले असून भाजपा त्यांच्या विचारांवर वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

chandrakant patil unveiled statue of Pandit Deendayal Upadhyay

 

भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते गोवा येथून व्हर्चुअल पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री आशिष शेलार व भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांची भाषणे झाली.

chandrakant patil unveiled statue of Pandit Deendayal Upadhyay

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोनाच्या संकटात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सेवेला महत्त्व दिले तसे महत्त्व अन्य कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिले नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांवरील सेवेचा संस्कार हा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांमुळे आहे. भाजपा दीनदयाळजींच्या विचारांवरच वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या सर्वांसाठी घरे, उज्वला योजना, उजाला योजना अशा गरीब कल्याणाच्या योजनांमध्येही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची प्रेरणा दिसेल. आत्मनिर्भर भारत हे दीनदयाळजींच्या चिंतनाचे पुढचे पाऊल आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानवाद आणि त्यांच्या विचारांसाठी संपूर्ण भारत त्यांचा ऋणी आहे.

chandrakant patil unveiled statue of Pandit Deendayal Upadhyay

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी महान विचार मांडले आणि जनसंघाच्या माध्यमातून हे तत्त्वज्ञान रुजवले. पक्षाच्या स्थापनेपासून सोळा वर्षे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी अपार कष्ट करून जनसंघ हा पक्ष वाढविला. माणसाला पोटाबरोबर मनाची, बुद्धीची आणि आत्म्याचीही भूक असते. याचा एकत्र विचार केला पाहिजे, असा आग्रह धरणारा एकात्म मानववाद पंडित दीनदयाळजींनी मांडला. दीनदयाळजींच्या विचारांच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याणाच्या योजना राबवत आहेत.

 

ते म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृती दिन हा भाजपासाठी समर्पण दिन असतो. त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आपण पक्ष पुढे नेत आहोत. भाजपा प्रदेश कार्यालयातील पंडितजींचा पुतळा कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल.

 

आशिष शेलार म्हणाले की, दीनदयाळजींचे विचार आजच्या राजकारणातही समर्पक ठरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताची निर्मिती होत आहे व त्याचे प्रणेते दीनदयाळ उपाध्याय आहेत.

 

प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाच्या समर्पित आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी केली. आजही त्यांच्या विचारांनुसार पक्षाचे कार्यकर्ते वाटचाल करत आहेत.

 

मंगलप्रभात लोढा म्हणाले की, आजच्या राजकारणात काही पेच निर्माण झाला तर मार्गदर्शनासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार मार्गदर्शक ठरतात.

पुतळ्यासाठीच्या योगदानाबद्दल मा. अनिल सुतार आणि मा. बापू पाटील यांचा मा. प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मा. प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी व्यासपीठावर मा. प्रदेश पदाधिकारी जयकुमार रावल, प्रसाद लाड, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, माधवी नाईक, कृपाशंकरसिंह, आशिष कुलकर्णी, अतुल वझे, रविंद्र चव्हाण, मनोज पांगारकर, सुमंत घैसास, डी. के मोहिते, सुधाकर भालेराव व हाजी अराफत शेख उपस्थित होते.


Tags: BJPPandit deendayal upadhyayपंडीत दीनदयाळ उपाध्यायभारतीय जनता पार्टी
Previous Post

अर्थमंत्री सीतारामण यांचा दावा: महागाई नियंत्रणातच! कोरोना संकटात थेट रोख मदत न देण्याचंही केलं समर्थन!

Next Post

सीएए आंदोलकांना वसुलीच्या नोटिस, सर्वोच्च न्यायालयानं उत्तरप्रदेश सरकारला फटकारलं! “रद्द करा, नाही तर आम्ही रद्द करतो!”

Next Post
Yogi adityanath And Supreme court

सीएए आंदोलकांना वसुलीच्या नोटिस, सर्वोच्च न्यायालयानं उत्तरप्रदेश सरकारला फटकारलं! "रद्द करा, नाही तर आम्ही रद्द करतो!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!