Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“थेट शरीराला स्पर्श नसेल तर गुन्हा नाही” असा निकाल अपमानास्पद, मग “ग्लोव्हज घालून विनयभंग करणारी व्यक्ती मुक्त होईल”!

सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला उच्च न्यायालयाचा निकाल!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
SC-HC

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला अपमानस्पद म्हटले आहे. या निकालात पोक्सो कायद्यानुसार अल्पवयीन मुलीच्या शरीराला थेट स्पर्श झाला नसेल तर तो गुन्हा नाही असे न्यायालयाने म्हटले होते. गुन्हा होण्यासाठी आरोपीचा पीडित व्यक्तीच्या शरीराला थेट स्पर्श होणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आल्याने वादही उफाळला होता. सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले की, ‘याचा अर्थ असा आहे की, या निर्णयामुळे ग्लोव्हज घालून विनयभंग करणारी व्यक्ती मुक्त होईल आणि त्याला कधीही शिक्षा होणार नाही.

 

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला उच्च न्यायालयाचा निकाल

  • न्यायमूर्ती यू. यू. ललित आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने या प्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी केली.
  • खंडपीठाने म्हटले आहे की, “उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, कपडे काढून थेट शरीराला स्पर्श नसेल तर गुन्हा नाही, तसे करणे पॉक्सो कायद्यान्वये लैंगिक शोषण श्रेणीत येणार नाही.”
  • अशाप्रकारे, गुन्हा केल्यानंतर कोणताही गुन्हेगार उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देण्यास सुरुवात करेल.
  • या प्रकरणात युथ बार असोसिएशन, अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल आणि इतरांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
  • त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली.

देशभरात ४३ हजार बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे

  • मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला.
  • म्हणूनच त्यांना याचिका दाखल करणे भाग पडले. सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक गुन्ह्याची व्याख्या अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करावी.
  • गेल्या वर्षभरात देशभरात ४३ हजार बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंदवले गेले आहेत, हे येथे मांडले गेले.

 

या प्रकरणात आरोपींच्या वतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात एकही वकील हजर झाला नाही. यावर खंडपीठाने विधी सेवा प्राधिकरणाला आरोपीच्या वतीने वकील नियुक्त करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी १४ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

 

काय आहे नेमकं प्रकरण?

  • हे प्रकरण नागपूरचे आहे.
  • तेथे राहणाऱ्या १६ वर्षाच्या मुलीच्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला होता.
  • ही घटना घडली तेव्हा तिचे वय १२ वर्ष आणि आरोपीचे वय हे ३९ वर्ष होते.
  • पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१६ मध्ये आरोपी सतीश तिला सामान देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला.
  • तिच्यावर लैगिंक अत्याचार केला.
  • पीडित मुलीची साक्ष नोंदवून पोक्सो कायद्यातंर्गत आरोपी सतीशला सत्र न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती.

 

सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली!

  • या निर्णयाला नागपूर खंठपीठात आव्हान देण्यात आलं होतं.
  • अल्पवयीन मुलींला कपडे काढून थेट शरीराला स्पर्श नसेल तर गुन्हा नाही हे पॉक्सो कायद्यान्वये लैंगिक शोषण श्रेणीत येणार नाही, असं मत नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांनी १९ जानेवारी रोजी आपल्या आदेशात व्यक्त केलं होतं.
  • सत्र न्यायालयाच्या याच निर्णयामध्ये संशोधन करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीच्या शिक्षेत कपात करत त्याला ३ वर्षांवरून १ वर्षाची शिक्षा सुनावली होती.
  • त्यावर खूप वाद निर्माण झाला होता.

Tags: nagpurskin to skin touch offenseमुंबई उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायलय
Previous Post

आमदार निलेश लंकेंविरोधात चित्रा वाघ तहसीलदार ज्योती देवरेंसोबत…‘रडायचं नाही, भिडायचं!’

Next Post

“कोरोनाचा धोका कमी झाल्यावर राज्यातील यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देण्यात येणार”

Next Post
amit deshmukh

"कोरोनाचा धोका कमी झाल्यावर राज्यातील यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देण्यात येणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!