Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुसऱ्या पत्नीला भरपाई दिल्याने पतीची हुंडा छळाच्या शिक्षेत कपात

सर्वोच्च न्यायालयाचा नवा पायंडा पाडणारा निकाल

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

हुंड्यासाठी अथवा अन्य कारणामुळे विवाहित महिलांवर अत्याचार करणे हा ४९८ अ या कलमांतर्गत गुन्हा आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका प्रकऱणात दिलेला निकाल वेगळा पायंडा पाडणारा ठरण्याची शक्यताय. एका दोषी व्यक्तीने त्याच्या दुसऱ्या पत्नीला आणि मुलांना उदरनिर्वाह भत्ता देण्याचे मान्य केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला झालेली शिक्षा कमी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, कोणत्याही गुन्हेगारी न्यायशास्त्राचा उद्देश गुन्हेगारामध्ये सुधारणा घडवणे आहे. जामीन मिळाल्यानंतर ती व्यक्ती पीडितेची काळजी घेईल. जर तो पत्नीला उदरनिर्वाह भत्ता देत असेल तर त्याची शिक्षा कमी केली जाऊ शकते.

 

उदरनिर्वाह भत्ता देऊन शिक्षेत सवलत

  • झारखंडमधील एका जोडप्यामधील वैवाहित वादाचे प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे.
  • पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली ४९८-अ कलमाखालीही गुन्हा दाखल झाला.
  • सीआरपीसीच्या कलम ३५७ अंतर्गत न्यायालयाने पतीने उदरनिर्वाह भत्ता दिला तर कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेत फेरविचाराचा अधिकार आहे.
  • पत्नी तीन लाख रुपये नुकसानभरपाई घेण्यासही तयार आहे.
  • न्यायालयाने सांगितले की, पत्नीला दोन लाख रुपये आणि मुलांच्या नावे ५०-५० हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जे २१ वर्षांचे झाल्यावर त्यांना दिले जातील.
  • जर त्याने उदरनिर्वाह भत्ता न्यायालयात जमा केला नाही तर त्याला उरलेली शिक्षाही भोगावी लागेल.

 

वैवाहिक प्रकरणातील खटल्यांमध्ये नवा पायंडा पाडणारे प्रकरण आहे तरी काय?

  • या प्रकरणात आरोपीची दुसरी पत्नी हिना बीबी हिने कलम ४९८ अ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. मानसिक आणि शारीरिक छळ आणि हुंड्याची मागणी केल्याचा आरोप केला होता.
  • ट्रायल कोर्टाने शमीउलला दोषी ठरवले आणि त्याला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
  • त्यांचे अपील अपिलीय न्यायालयाने फेटाळले आणि नंतर त्यांची पुनरीक्षण याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
  • यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आल्यावर, न्यालयापुढे त्यांनी सांगितले की पत्नी आणि मुलांना तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यास पती तयार आहे.
  • परंतु पैसे उभारण्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा वेळ आवश्यक आहे.

Tags: dowrySupreme Courtसर्वोच्च न्यायालयहुंडा
Previous Post

कथित क्लीन चिटची प्रत अनिल देशमुखांना महाग पडली!

Next Post

तरुण वयातच हृदयविकाराने निधन!! जाणून घ्या कमी वयातील हृदयविकाराची कारणे…

Next Post
heart problems

तरुण वयातच हृदयविकाराने निधन!! जाणून घ्या कमी वयातील हृदयविकाराची कारणे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!