Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कथित क्लीन चिटची प्रत अनिल देशमुखांना महाग पडली!

वकिलाला अटक, सीबीआयचा अधिकारीही जेरबंद!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Anil deshmukh

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. गेले काही दिवस त्यांना ज्या कथित क्लीन चिटमुळे दिलासा मिळाल्यासारखे वाटले ते सारंच तात्पुरतं ठरलं आहे. आणि तीच क्लीन चिट देशमुखांना संकटात टाकणारी ठरली आहे. कारण क्लीन चिट देणारा तो प्राथमिक अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयने देशमुखांचे वकिल आनंद डागा यांना अटक केली आहे. तसेच याआधी सीबीआयने अभिषेक तिवारी या त्यांच्याच विभागाच्या उपनिरीक्षकांना अटक केली आहे. तिवारी यांनी लाच घेऊनन अनिल देशमुख यांच्या वकिलाला कथित चौकशी अहवालाची प्रत दिल्याचा आरोप आहे.

 

तात्पुरता दिलासा, देशमुखांसाठी महागडा!

  • गेल्या आठवड्यात मीडियामध्ये सीबीआयच्या चौकशी अहवालाचे एक पान लीक झाले होते.
  • ज्यात अनिल देशमुख यांना कथितपणे क्लीन चिट देण्यात आल्याचे म्हटले होते.
  • लीक झालेल्या अहवालात तपास अधिकाऱ्याने देशमुख यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्यने तपास थांबवण्याची शिफारस केल्याचा उल्लेख होता.
  • देशमुख यांनी “कोणताही दखलपात्र गुन्हा केला नाही”. असे त्यात म्हटले होते.
  • त्यानंतर या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
  • देशमुख यांच्या निकटवर्तीयांनी एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन तपासाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

देशमुख यांच्या जावयाचीही चौकशी

  • तपास अहवाल लीक झाल्यानंतर एजन्सीने सुरुवातीला देशमुख यांच्या जावयाची चौकशी केली होती.
  • त्याची चौकशी केल्यानंतर आता आनंद डागा यांची चौकशी केली जात आहे.
  • गेल्या आठवड्यात, तपास अधिकाऱ्याच्या शिफारशींविरोधात देशमुखविरोधात गुन्हा नोंदवल्याच्या अहवालानंतर, एजन्सीने सांगितले की, हा खटला उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या उत्तरार्ध दाखल करण्यात आला आहे.

 

सीबीआयवर राष्ट्रवादीचा आरोप

  • सीबीआयने अनिल देशमुख यांच्या जावयाला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
  • राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्यमंत्री नवाब मलिक म्हणाले की, त्याला ताब्यात घेण्यापूर्वी कोणतेही नियम किंवा कार्यवाही केली गेली नाही.
  • वरळी येथील निवासस्थानापासून ते कुटुंबासह बाहेर जात होते.
  • मग अचानक १०-१२ लोक आले आणि त्यांना ताब्यात घेतले. हे कायद्यानुसार नाही.
  • हे कायद्याचे राज्य आहे की राज्यकर्त्यांचे राज्य? असा प्रश्न नवाब यांनी उपस्थित केला.

 

परमबिरांच्या शंभर कोटीच्या पत्रापासून देशमुखांमागे संकटांची मालिका

  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपये वसुल केल्याचा आरोप करणारे तीन पानी पत्र जारी केले.
  • देशमुख यांनी प्राथमिक चौकशीनंतर एप्रिलमध्ये राजीनामा दिला पण त्यांच्यावर झालेले आरोप नाकारले.
  • यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले.
  • न्यायालयाच्या निर्णयानंतर २४ एप्रिल रोजी देशमुख आणि काही अज्ञात लोकांविरोधात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या आरोपाखाली गुन्हे नोंदवून कारवाई सुरु आहे.
  • त्यातच ईडीनेही देशमुखांच्या प्रकरणात स्वतंत्ररीत्या तपास सुरु केला आहे.
  • त्यातच आता क्लीन चिट देणारा अहवाल मिळवण्यासाठी देशमुखांच्या निकटवर्तियांनी प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने नवे संकट ओढवले आहे.

 

क्लीन चिटचा किती फायदा?

  • महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी.के.जैन यांनी या प्रकरणातील पोलीस कार्यप्रणाली समजवून सांगितली आहे.
  • या क्लीन चिटचा अनिल देशमुखांना जास्त फायदा होण्याची शक्यता नाही.
  • जी प्रत सोशल मीडियात आणि मुख्य माध्यमांमध्येही चालली ती या प्रकरणात नंतर गुन्हा नोंदवणारे तपास अधिकारी मुंजाळ यांनीच लिहिलेल्या चौकशी अहवालाची असल्याचे सांगितले जाते.
  • ती सादर झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी ती पुन्हा नव्याने तपास करून, नव्या काही मुद्द्यांचा समावेश करून त्या दिशेने नवा तपास करून तयार करण्यास सांगू शकतात.
  • काहीवेळा प्राथमिक चौकशी अहवालानंतर नवे काही पुरावे समोर आले तर सुरुवातीला क्लीन चिट दिली असली तरी नंतर गंभीर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.
  • त्यामुळे आधी क्लीन चिट दिली असली तरी नंतर गंभीर गुन्ह्याप्रकऱणी कारवाई अशक्य नसते.

Tags: anil deshmukhCBINawab Malikअनिल देशमुखक्लीन चिटनवाब मलिकपी.के.जैनमहाराष्ट्रवकिल आनंद डागा
Previous Post

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपद भाग्यश्री बानायत-धिवरे

Next Post

दुसऱ्या पत्नीला भरपाई दिल्याने पतीची हुंडा छळाच्या शिक्षेत कपात

Next Post
supreme court

दुसऱ्या पत्नीला भरपाई दिल्याने पतीची हुंडा छळाच्या शिक्षेत कपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!