मुक्तपीठ टीम
अभिनेता सोनू सुद म्हटले की प्रत्यक्ष जीवनातील महानायकच आठवतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत घरी परतणारे मजूर असो की दुसऱ्या लाटेतील गरजू रुग्ण…अभिनेता सोनू सुदकडे मागणी आली आणि त्यांनी मदत केली नाही, असे झालेच नाही. सततच्या मदत कार्यामुळे चौफेर कौतुक होणारे सोनु सुद यांना त्यांच्या कार्यात हातभार लावण्यासाठी दोन चिमुरड्या मुली पुढे आल्यात.
राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सांचोरमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकणारी माही आणि इयत्ता पहिलीत शिकणारी तिची बहिण प्रथाने एक भन्नाट काम केले आङे. त्यांनी गेल्या ३ वर्षांपासून जमा केलेली पॉकेटमनी सोनू सुद फाउंडेशनला मदतीसाठी पाठवली आहे. सोनू सुद यांनी या मुलींच्या पुढाकाराला रिट्वीट करत, त्यास सर्वात मौल्यवान देणगी म्हटलं आहे.
इन बेटियों ने गुल्लक से केवल आर्थिक सहायता नहीं, बल्कि अपने जीवन की पूरी कमाई या यूं कहिए पूरी बचत जरूरतमंदों के लिए समर्पित कर दी है। मैं इस सेवाभाव के लिए दोनों नन्हीं बेटियों व उनके माता-पिता को वंदन करती हूं। आपके यह उम्दा विचार ही सुनहरे भारत का भविष्य है।#HeroesOfRajasthan https://t.co/LR6pIPAxxh
— Vasundhara Raje (@VasundharaBJP) June 6, 2021
मुलींच्या या उपक्रमाचे कौतुक करीत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही मुलांच्या पालकांचे आभार मानले आहेत आणि त्यांच्या सुयोग्य संगोपनासाठी पालकांचे कौतुक केले आहे.
सोनू सुद फाउंडेशनचे स्थानिक सदस्य हितेश जैन यांना या मुलींविषयी माहिती मिळाली. दहा वर्षांच्या माहीने आणि सहा वर्षाच्या प्रथानेही एकत्र व्हिडीओ बनविला. ज्याला हितेशने सोनू सुद यांना टॅग केले होते. सोनू सुदने हा व्हिडीओ व्हायरल केला, त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांची सेवा करण्याची इच्छा पाहून राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही लहान त्यांचे कौतुक केले.
वसुंधरा राजे यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “या मुलींनी केवळ पिगी बँकेमधून आर्थिक मदत केली नाही, तर त्यांची संपूर्ण बचत गरजूंना समर्पित केली आहेत. या सेवेसाठी मी दोन्ही लहान मुली आणि त्यांच्या आईचे आभार मानते. मी वडिलांना नमन करते. तुमचे चांगले विचार हेच सुवर्ण भारताचे भविष्य आहेत.”
पाहा व्हिडीओ: