Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनामुक्त गावासाठी आशासेविकांवर जनजागरणाची जबाबदारी

कोरोनाकाळातील कामाबद्दल आशा सेविकांना मुख्यमंत्र्यांकडून मानाचा मुजरा

June 7, 2021
in सरकारी बातम्या
0
CM Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी ‘आशा’ सेविकांची भूमिका महत्वाची आहे. पालकांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करतानाच कोरोनामुक्त गावासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. गावातील वस्तीची जबाबदारी घेऊन कोरोनामुक्तीसाठी त्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशा सेविकांना केले आहे. तसेच आशा सेविकांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

 

मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, बालरोग तज्ञांच्या टास्फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर यांच्यासह राज्यभरातील सुमारे ७० हजार आशा सेविका या ऑनलाईन परिषदेत सहभागी झाले होते.

 

अन्य साथीच्या आजाराची माहिती प्रशासनाला तातडीने कळवावी

बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सने ज्या सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करतानाच कोरोना व्यतिरिक्त एखाद्या आजाराची साथ, लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने माहिती प्रशासकीय यंत्रणेला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांना केले. बालकांची काळजी घेण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करावे त्यांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करण्याचे काम आशा सेविकांनी करावे. कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातूनच बालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

 

कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे

कोरोना व्यतिरिक्तही कुपोषणाचे संकट आहे त्याला सामोरे जाताना कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाच्या कोरोना मुक्त गाव मोहिमेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा. गावातील वाड्या वस्त्यांची जबाबदार घेऊन त्यांना कोरोनामुक्तीसाठी मार्गदर्शन करा, असे सांगितले.

 

‘आशा’ शब्दाला साजेस काम

आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेल्या यशाचे तुम्ही शिलेदार आहात असे गौरवपूर्ण उद्गार काढतानाच राज्यातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात असून या सुविधांची आपण मुळं आहात ती मजबूत करण्याचं काम केले जात असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. आपल्याला जगवते ती आपल्यातली ‘आशा’ हा शब्द ज्याप्रकारे तयार झाला आहे त्याला साजेसं काम आशा ताई करीत आहेत. ते असेच कायम ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 

संभाव्य तिसरी लाट रोखण्यात आशाताईंची महत्वाची भूमिका

मुख्यमंत्री म्हणाले, आशा, अंगणवाडी सेविका प्रशासनाचा पाठकणा असून स्वताची प्रकृती, कुटुंब याकडे लक्ष न देता ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत आहात. त्यासाठी मी मानाचा मुजरा करतो. आशा, अंगणवाडी सेविकांच्या ज्या व्यथा, अपेक्षा आहेत त्याची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. आपले ऋण विसणार नाही. आपल्या व्यथांवर मार्ग काढला जात आहे त्याला थोडा अवधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशाताईंना केले. महाराष्ट्राच कुटुंब आपण तळ हाताच्या फोडासारखं जपत आला आहात तज्ञांच्या मतानुसार कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये जाणवणार असून ती रोखण्यासाठी आशा ताईंची भुमिका महत्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

यावेळी टास्क फोर्समधील डॉ. प्रभू, डॉ. येवले, डॉ. किणीकर, डॉ. दलवाई यांनी सोप्या भाषेत कोरोना प्रतिबंध व उपचार, लहान मुलांसाठी पौष्टीक आहार, मानसिक आजार याविषयी मार्गदर्शन केले. तर मुरबाड येथील रोहीणी भोंदिवले, पातोंडा जि. नंदूरबार येथील साधना पिंपळे, भंडारा येथील भुमिका बंजारी, हिंगोली येथील सुनिता कुरवडे या आशा सेविकांनी मनोगत व्यक्त केले.

 

 

 

 


Tags: chief minister uddhav thackeraycoronaअंगणवाडी सेविकाआशा सेविकाडॉ. सुहास प्रभूसीताराम कुंटे
Previous Post

सॅनिटायझरने दुसऱ्यांचे जीवन सुरक्षित ठेवणाऱ्या कामगारांचाच आगीत होरपळून मृत्यू

Next Post

जगाला मदत करणाऱ्या सोनू सुदच्या मदतीसाठी पिगी बँक फोडणाऱ्या बहिणी

Next Post
sonu sood

जगाला मदत करणाऱ्या सोनू सुदच्या मदतीसाठी पिगी बँक फोडणाऱ्या बहिणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!