Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डेटॉलच्या पॅकवर झळकणार सेलिब्रिटी नाही, रक्तासाठी मदत करणारा अस्सल हिरो…’द ब्लडमॅन’!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Dettol

मुक्तपीठ टीम

कोरोना संकट काळातील महामारीत अनेक चांगली माणसं चांगलं कार्य करत आहेत. अनेक जण गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. बिहारमधील पाट मुकेश हिसारिया हे देखील समाजासाठी धडपडणाऱ्या चांगल्या माणसांपैकी एक आहेत. मुकेश आपल्या रक्तदान सेवेमुळे ब्लडमॅन म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात लोकांना मदत केल्याबद्दल डेटॉल कंपनीने मुकेश यांचा गौरव केला आहे. डेटॉलने त्यांचा अवर प्रोटेक्टर पुरस्काराने सन्मान केला आहे. अमिताभ बच्चन यांनीही मुकेशच्या सामाजिक कार्यांसाठी त्यांचं कौतुक केले आहे.

 

मुकेश यांनी आतापर्यंत रक्त देऊन ५०हून अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत. त्याशिवाय आतापर्यंत गरीब कुटुंबातील ४८८ मुलींचा जनतेच्या मदतीने विवाह करून दिला आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बेवारस मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केला, त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेमुळे डेटॉलने त्यांचा गौरव केला. मात्र, मुकेशने त्यांचे छायाचित्र डेटॉलच्या पॅकवर वापरण्यासाठी एक अट घातली आहे. डेटॉल उत्पादक कंपनी प्रॉक्टर अँड गँबलने चार थॅलिसिनियाग्रस्त मुलांचा वेल्लोरमधील उपचाराचा संपूर्ण खर्च करण्याची ही अट मुकेश यांच्या सेवाभावी वृत्तीच दाखवते. त्यांच्या कार्याला मुक्तपीठचा सलाम!

डेटॉलच्या प्रॉडक्ट पॅकवर मुकेश यांचा फोटो

१. डेटॉल कंपनीने मुकेश यांच्याबरोबर करार केला आहे.
२. त्याअंतर्गत त्यांचा फोटो डेटॉल उत्पादनांच्या पॅकवर दिसणार आहे.
३. समाजासाठी संकट काळात त्यांनी केलेले कार्य यावरही चर्चा करण्यात येणार आहे.
४. आपली कथा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी डेटटॉलने मुकेश यांच्यासोबत ६ महिन्यांचा करार केला आहे.
५. डेटॉलने त्याच्या फोटोसह डेटॉलचा एक पॅक आणि प्रशस्तीपत्र मुकेश यांना पाठवले आहे.

 

मुकेश अनेक सन्मानाचे ठरले मानकरी

  • मुकेश हिसारिया हे एक व्यापारी आहेत.
  • २०१३ मध्ये कौन बनेगा करोडपती या टीव्ही शोमध्ये त्यांना बोलावले होते.
  • या शोमध्ये त्यांना बोलवण्याचे कारण त्यांचे समाज कार्य होते.
  • मुकेशने आतापर्यंत रक्त देऊन ५० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत.
  • त्याशिवाय आतापर्यंत गरीब कुटुंबातील ४८८ मुलींचा जनतेच्या मदतीने विवाह करून दिला आहे.
  • मुकेश अशा मुलींसाठी सामुहिक विवाहसोहळा आयोजित करतात ज्यांना आपल्या मुलींचे लग्न परवडत नाही.

 

अमिताभ बच्चन यांच्या प्रेरणेने ब्लड बँक

• कौन बनेगा करोडपती शोमध्ये अमिताभ यांनी मुकेश यांचे कौतुक केले होते. त्याच वेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांना ब्लड बँक तयार करण्यास सांगितले होते.
• एक अशी ब्लड बँक कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
• त्यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले होते की, खर्चापैकी ५० टक्के निधी त्यांच्या वतीने असेल आणि ५० टक्के निधी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या वतीने देण्यात येईल.
• शाहरुख खाननेही मुकेश यांना २०१६ मध्ये आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आमंत्रित केले होते.
• २०१७ मध्ये कपिल शर्मानेही त्याला आपल्या शोमध्ये बोलावले होते.

 

१२५ मृतदेहांवरही अंत्यसंस्कार

• मुकेश यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत १२५ मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले आहेत.
• हे मृतदेह ज्यांचे होते त्यांचे कुटुंबीय शेवटचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढेही येत नव्हते.
• असे बरेच लोक मुकेश यांच्याशी संपर्क साधत असत.
• अशा सर्व मृतदेहांवर मुकेश यांनी पूर्ण आदरपूर्वक अंत्यसंस्कार केले.
• इतकेच नाही तर व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातूनही घरातील सदस्यांना शेवटचे दाखवले गेले.

 

डेटॉल कंपनीला मुकेश यांची अट

• जेव्हा डेटॉल कंपनीने त्यांच्याशी या सन्मानाबद्दल बोलणी केली, तेव्हा मुकेश यांनी त्यांची अट समोर ठेवली.
• थॅलेसीमिया ग्रस्त ४ मुलांच्या उपचारासाठी वेल्लोरमध्ये राहण्याचा खर्च उचलण्याची मागणी त्यांनी कंपनीकडे केली आहे.
• डेटॉलच्या पॅकवर त्यांचा फोटो वापरला जात आहे या बदल्यात मुकेश यांनी ही मागणी केली आहे.
• कंपनीने यावर विचार करण्याचे म्हटले आहे.
• मुकेश हे थॅलेसीमियाग्रस्त मुलांच्या उपचारासाठी काम करतात.
• थॅलेसीमिया असलेल्या मुलांना दर १५ दिवसांनी रक्ताची आवश्यकता असते.
• त्याचा खर्च लाखोंमध्ये आहे. यामुळेच मुकेश अशा मुलांना मदत करतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BloodmanDettolmukesh hisariyaअमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपतीडेटॉल कंपनीब्लडमॅनमुकेश हिसारियाशाहरुख खान
Previous Post

जगाला मदत करणाऱ्या सोनू सुदच्या मदतीसाठी पिगी बँक फोडणाऱ्या बहिणी

Next Post

ज्याला गरज तिथं सुराज्य सर्वांगीण, पुण्यात घरगुती डब्याची खास सुविधा

Next Post
Surajya

ज्याला गरज तिथं सुराज्य सर्वांगीण, पुण्यात घरगुती डब्याची खास सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!