Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रविवार-सोमवार…मुंबईसाठी हाय अलर्ट!

घरीच राहा, सुरक्षित राहा...कशी आहे मुंबई मनपाची तयारी?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BMC

मुक्तपीठ टीम

मुंबईसाठी रविवार १३ जून आणि सोमवार १४ जून हे दोन दिवस धोक्याचे आहेत. हवामान खात्यानं हे दोन दिवस मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आवश्यक काम नसेल तर मुंबईकरांनी घराबाहेर जाऊ, नये असा सल्ला देण्यात आला आहे. तेवढंच नाही तर मनपाच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याने समुद्र किनारे व लगतचा परिसर इत्‍यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन केले आहे. मुंबई मनपाने अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन कमालीचे प्रयत्न केले आहेत.

 

मुंबई मनपाची यंत्रणा सज्ज

• विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना अतिदक्ष राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
• मुंबई मनपाची सर्व यंत्रणा सुसज्ज व सतर्क आहेत.
• मुंबई मनपाचे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सज्ज आहेत.
• पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे व विविध ठिकाणी बसवण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे उदंचन पंप कार्यरत असल्याची तपासणी करण्यात आली आहे.
• या सर्व संचांमधील पंपसाठी आवश्यक त्या डिझेलची व्यवस्थादेखील स्थानिक उदंचन संच चालकांद्वारे करण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता

• मुंबई अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक केंद्रांवर सज्ज आहेत.
• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक म्हणजेच एनडीआरएफ आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत आणि बचाव मोहिमेसाठी सज्ज आहे.
• भारतीय तटरक्षक दल, नौसेना समन्वयक अधिकाऱ्यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज कळवण्यात आला आहे. तेही आवश्यकता निर्माण झाल्यास मदतीकरता सज्ज आहेत.
• बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन अति दक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
• वीज कंपन्यांची पथके वीज पुरवठ्याच्यासंदर्भातील कोणत्याही आणीबाणी त्यांची मदत पथके सुसज्ज व सतर्क आहेत.

 

बचावापासून आश्रयापर्यंत सर्व तयारी

• मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व सज्ज आहे.
• आणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलिस, बेस्ट, शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांचे समन्वयक अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.
• मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आल्या आहेत.
• मिठी परिसरात त्वरित मदतीकरता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडी तेथेच तैनात करण्यात आली आहे.
• मुंबई मनपाच्या २४ विभागांमधील काही मनपा शाळा या तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आल्या आहेत, परिस्थिती उद्भवल्यास त्या शाळा त्वरि‍त निवारा आणि अन्य सुविधेसाठी सुसज्ज आहेत.


Tags: Heavy rainmumbaiMy BMCपाऊसबृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई मनपा
Previous Post

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली परभणीतील ऑक्सिजन प्लांटची पाहणी

Next Post

अखेर कोरोना रोखण्यासाठी आवश्यक वस्तू, औषधांवरील जीएसटी कमी

Next Post
Nirmala Sitharaman

अखेर कोरोना रोखण्यासाठी आवश्यक वस्तू, औषधांवरील जीएसटी कमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!