Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर कोरोना रोखण्यासाठी आवश्यक वस्तू, औषधांवरील जीएसटी कमी

अॅम्ब्युलन्स, रेमेडेसिव्हिर आणि कोरोना लसीवरील दर कमी करण्याचा निर्णय

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nirmala Sitharaman

मुक्तपीठ टीम

वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेची ४४वी बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अॅम्ब्युलन्स भाड्यात जीएसटी कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी घेतला आहे. यासह परिषदेने बैठकीत कोरोना साथीच्या आजाराशी संबंधित आवश्यक वस्तू आणि काळ्या बुरशीच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या औषधांवरील जीएसटी दर कमी केले आहेत. काळ्या बुरशीच्या औषधावर कोणताही कर नसणार असा निर्णय घेण्यात आला आहे.

 

म्युकर मायकॉसिसची औषधे करमुक्त

• म्युकर मायकॉसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या औषधावर कोणताही कर नसणार आहे.

• कोरोना लसींवर ५ टक्के जीएसटी
• केंद्र सरकार ७५ टक्के लस खरेदी करीत असून त्यावर जीएसटीही भरत आहे.
• सरकारी दवाखान्यात लोकांना ७५ टक्के लस दिली जात असून त्याचा जनतेवर परिणाम होणार नाही.
• अर्थमंत्री निर्मला सीतारामण तसे म्हणाल्या असल्या तरी २५ टक्के पुरवठा हा खासगी रुग्णालयांसाठी असल्याने तेथे लस घेणाऱ्यांना नक्कीच लाभ मिळू शकेल.

 

कोरोनासाठी आवश्यक औषधांवरील कर ५ टक्क्यांवर

• रेमडेसिव्हिर नावाच्या औषधाचे कर दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
• त्याचप्रमाणे, टॉसिलीझुमॅब आणि अँफोटेरेसिन बी सारख्या औषधांवर कोणतेही कर आकारले जाणार नाही.

 

आवश्यक वैद्यकीय वस्तूंवरही ५ टक्के कर

• ऑक्सिजन, ऑक्सिजन उत्पादन उपकरणे, टेस्टिंग किट, इतर मशीन्स आणि कोरोना सामग्रीचा समावेश आहे.
• व्हेंटिलेटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि बीआयपीएपी मशीनवरील जीएसटी सध्याच्या १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आले आहे.

 

रुग्णवाहिकांसाठी १२ टक्के जीएसटी

• कोरोना संकट काळात रुग्णवाहिकांची लोकांचे प्राण वाचविण्यात मोठी भूमिका आहे. त्यामुळे त्यावर जीएसटीचे दर २८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.
• कोरोना काळात बर्‍याच गोष्टींवर १८ टक्के जीएसटी लादला जात होता, तो आता ५ टक्क्यांवर आला आहे.
• अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्यावर १२ टक्के जीएसटी लावण्यात आला होता, तो देखील ५ टक्के करण्यात आला आहे.


Tags: gst council meetingnirmala sitharamanअर्थमंत्री निर्मला सीतारामणकोरोनाजीएसटी परिषद
Previous Post

रविवार-सोमवार…मुंबईसाठी हाय अलर्ट!

Next Post

आज १४ हजार ९१० कोरोनामुक्त होऊन घरी परतले! परभणी शहरात शून्य नवे रुग्ण!

Next Post
MCR 1-5-21

आज १४ हजार ९१० कोरोनामुक्त होऊन घरी परतले! परभणी शहरात शून्य नवे रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!