Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऊसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याकरिता साखर कारखान्यांनी प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवावे

January 13, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Dadaji Bhuse

मुक्तपीठ टीम

 

ऊसाचे क्षेत्र जास्तीत जास्त ठिबक सिंचनाखाली आणावे. साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षेत्रातील ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याकरिता प्रोत्साहनात्मक उपक्रम हाती घ्यावे. ऊसाच्या प्रजातीची निर्मिती करताना साखरेचे प्रमाण अधिक त्याचबरोबर अल्कोहोल निर्मितीसाठी योग्य प्रजातीच्या संशोधनासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

 

राज्यातील ऊस संशोधन प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.धवन, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे (व्हीएसआय) संचालक विकास देशमुख, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉ.रासकर, डॉ.शरद गडाख आदी यावेळी उपस्थित होते.

ऊस

राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि ‘व्हीएसआय’ यांनी राज्यातील ऊस ऊपादन व संशोधनाबाबत दर तीन महिन्यांनी बैठक घ्यावी. याबाबत पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने समन्वय करण्याचे आवाहन कृषीमंत्री  भुसे यांनी केले.

 

राज्यात ऊस संशोधनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आणि व्हीएसआय या संस्था अग्रणी आहेत. कोकणात देखील ऊसाखालील क्षेत्र वाढण्यास संधी असून त्या संदर्भात बैठकीत आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली येथील हवामान ऊस उत्पादनासाठी अनुकुल असून त्या अनुषंगाने व्हीएसआयने तेथे ब्रिडींग सेंटर उभारले आहे. तेथे देशातील विविध वाणांची लागवड करण्यात आली असून संशोधनाचे कार्य सुरु आहे. या क्षेत्राचा वापर कृषी विद्यापीठांनी करावा. तसेच व्हीएसआयला चाचण्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले.


Tags: Dadaji Bhusedrip irrigationSugarcaneऊसठिबक सिंचनदादाजी भुसे
Previous Post

भाजपकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

Next Post

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा

Next Post
Gulabrao Patil

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!