Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साखर उद्योगाचा गोडवा वाढतोय! साखर निर्यात २०१३-१४ पासून आतापर्यंत २९१ टक्क्यांनी वाढली!!

September 6, 2026
in Uncategorized, घडलं-बिघडलं
0
Sugar

मुक्तपीठ टीम

भारताच्या साखर निर्यातीत २९१% ची घसघशीत वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये १,१७७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीच्या साखरेची निर्यात झाली होती तर आता आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये तब्बल ४६०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीची साखर निर्यात करण्यात आली आहे. डीजीसीआय अँड एस अर्थात वाणिज्य गुप्तचर आणि सांख्यिकी महासंचालनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारताने जगभरातील १२१ देशांना साखर निर्यात केली आहे.

 

वर्ष २०२१-२२ मध्ये देशाची साखर निर्यात त्याआधीच्या वर्षीपेक्षा ६५% नी वधारली. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या, मालवाहतुकीचे वाढीव दर, कंटेनर्सची टंचाई यासारख्या वाहतूकविषयक आव्हानांवर मात करून ही वाढ करण्यात यश मिळाले आहे.

 

ट्विट संदेशामध्ये या ऐतिहासिक कामगिरीवर अधिक भर देत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, मोदी सरकारची धोरणे देशातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारात प्रवेश करून उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करत आहेत.

 

डीजीसीआय अँड एस कडे उपलब्ध माहितीनुसार, भारताने २०१९-२० मध्ये १९६५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीची साखर निर्यात केली होती त्यात वाढ होऊन २०२०-२१ मध्ये ती २७९० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स झाली तर २०२१-२२ मध्ये यात आणखी वाढ होऊन या वर्षी ४६०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीची साखर निर्यात करण्यात आली.

 

आता, वर्ष २०२१-२२ मध्ये (एप्रिल ते फेब्रुवारी या काळात) भारताने, ७६९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या साखरेची इंडोनेशिया देशाला निर्यात केली आहे, तर बांगलादेश(५६१ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), सुदान(५३० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) आणि संयुक्त अरब अमिरात (२७० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)इतक्या मूल्याची साखर निर्यात केली आहे. भारताने अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका,जर्मनी,फ्रान्स,न्यूझीलंड, सोमालिया, सौदी अरब, मलेशिया, श्रीलंका, रशिया आणि इजिप्त इत्यादी देशांना देखील साखर निर्यात केली आहे.

      Unit: USD Million

Products 2019-20 2020-21

 

2021-22
Sugar 1965 2791 4600

विक्रमी निर्यातीनंतर देखील, २०२१-२२ च्या साखर हंगामाच्या (ऑक्टोबर ते सप्टेंबर) अखेरीला देशाकडे ७३ लाख टन इतक्या दिलासादायक पातळीचा साठा शिल्लक असेल. साखर निर्यातीचा वाढीचा कल कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व सरकार करणार आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: DGCI & SIndiasugarडीजीसीआय अँड एसभारतसाखर
Previous Post

‘हस्तकला, पाककला आणि संस्कृती यांचा संगम’ असलेल्या ‘हुनर हाट’ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद

Next Post

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर पदांवर करिअर संधी

Next Post
IB

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर पदांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!