मुक्तपीठ टीम
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. “मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी वेळोवेळी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्याच निर्धाराचा पुनरुच्चार करत, आज मंत्रिमंडळाने ऊस उत्पादकांसाठी एफआरपी किंमत २९० रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. असे अमित शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
किसानों को खुशहाल व सशक्त बनाने हेतु समय समय पर मोदी सरकार ने कई महत्वपूर्ण कदम उठाए हैं।
अपने उसी संकल्प को दोहराते हुए आज कैबिनेट द्वारा गन्ना किसानों के लिए गन्ने का FRP मूल्य अब तक का उच्चतम ₹290 प्रति क्विंटल करने के निर्णय पर @narendramodi जी का आभार व्यक्त करता हूँ। pic.twitter.com/5tJLfkWrVX
— Amit Shah (@AmitShah) August 25, 2021
‘सुलभ शेती-आत्मनिर्भर शेतकरी’ या दिशेने घेतलेल्या या निर्णयामुळे साखरेची निर्यात आणि इथेनॉलचे उत्पादन वाढेल, परिणामी ऊस उत्पादकांचे उत्पन्न देखील वाढेल. मोदी सरकारच्या या कल्याणकारी निर्णयामुळे देशातील ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी कुटुंबांना आणि त्याच्याशी निगडित त ५ लाख कामगारांना अभूतपूर्व लाभ मिळतील, असंही शाह यांनी म्हटले आहे.