Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दत्त संप्रदायाला वाहून घेतलेले नवे ओटीटी चॅनेल ‘अवधूत चिंतन’

August 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
Avadhut Chintan

मुक्तपीठ टीम

‘अवधूत चिंतन क्रिएशन्स प्रा.ली.’ या संस्थेने नुकतेच ‘अनघाष्टमी’च्या मुहूर्तावर “अवधूत चिंतन” या मोबाईल ॲपचे म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले आहे. दत्तात्रय महाराजांच्या ध्येयवेड्या भक्तरुपी सेवकांनी मिळून ‘श्री गुरुदेव दत्त महाराजांविषयीची माहिती जगभरात सर्वत्र नव्या पिढीपर्यंत पोहचत रहावी म्हणून हे महत्वाकांक्षी कार्य सुरु केले आहे.

 

श्री गुरु दत्त महाराजांच्या अवतारांच्या चरित्र कथा “अवधूत चिंतन” या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिज माध्यमातून प्रथमच येत आहेत.अध्यात्म आणि मनोरंजन यांचा सुरेख मिलाफ असणाऱ्या “श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये” आणि ‘श्री स्वामी समर्थ’ यांच्या वरील मालिका “स्वामी हो…” या प्रेक्षकांच्या पसंतीस अल्पावधीतच उतरल्या आहेत.

 

“अवधूत चिंतन” या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या निर्मिती प्रक्रियेत प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक असित रेडीज, मिलिंद जाधव, आणि तेजस आर्ते यांनी सेवेकरी या नात्याने अहोरात्र मेहनत घेऊन हे अत्यंत वेगळे आणि सकस मनोरंजनासोबतच महत्वपूर्ण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे.

Avadhut Chintan

या ओटीटी प्लॅटफॉर्मचे कंटेंट हेड आणि क्रिएटिव्ह हेड असित रेडीज असून , ख्यातनाम लेखक प्रविण शांताराम यांनी वरील दोन्ही सीरिजचे पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. दिग्दर्शनाची धुरा असित रेडीज यांच्या सोबतीने दीपक देसाई यांनी सांभाळली आहे.

 

“अवधूत चिंतन” या मोबाईल ॲपवर सुरू असलेल्या दर्जेदार मालिका मराठी प्रेक्षकांसोबत सर्व भाषिक प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत आहेत. संपूर्ण जगात पहिल्यांदाच असा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्या बद्दल अनेक मान्यवरांनी निर्मात्यांचे अभिनंदन केले आहे, त्याच बरोबरीने पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, कारंजा, गिरनार येथील प्रमुखांनी “अवधूत चिंतन” या ओटीटी प्लॅटफॉर्मला शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत.


Tags: OTTpriya berdeअवधूत चिंतनअसित रेडीजओटीटी प्लॅटफॉर्मतेजस आर्तेमिलिंद जाधवश्री स्वामी समर्थ
Previous Post

ऊसाचा एफआरपी वाढवल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Next Post

“मेडिकल प्रवेशात सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेशिवाय सवर्ण आरक्षण देण्यास मनाई”!

Next Post
SC-madaras

"मेडिकल प्रवेशात सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेशिवाय सवर्ण आरक्षण देण्यास मनाई"!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!