Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“१०० बेड्सचे कोरोना सेंटर तयार करा, ५० ऑक्‍सिजन बेड्सना त्‍वरित मंजुरी द्या”- सुधीर मुनगंटीवार

April 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
sudhir

मुक्तपीठ टीम

 

शहर आणि तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता मुल शहरात नविन १०० बेड्स कोरोना केअर सेंटर तयार करण्‍यात यावे तसेच ५० ऑक्‍सीजन बेडसला मंजुरी दयावी त्‍याचप्रमाणे आरटीपीसीआर चाचणी केंद्रांची संख्‍या वाढवत चाचण्‍यांवर भर दयावा, फलक, लाउडस्पिकर आदींच्‍या माध्‍यमातुन कोरोना विषयक जागृतीवर भर देण्‍याच्‍या सुचना देत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १० लीटर क्षमतेचे १० ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर मुलसाठी उपलब्‍ध करून देणार असल्‍याचे जाहीर केले. त्‍याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्‍टेशन या दोन ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशिन उपलब्‍ध करणार असल्‍याचे जाहीर केले.  त्‍याचप्रमाणे या तालुक्‍यासाठी एक रूग्‍णवाहिका सुध्‍दा उपलब्‍ध करण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.

 

२७ एप्रिल रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मुल येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्‍यांनी मुल शहर व तालुक्‍यातील कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला नगराध्‍यक्षा रत्‍नमाला भोयर, उपनगराध्‍यक्ष नंदु रणदीवे, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, विनोद सिडाम, मिलींद खोब्रागडे, प्रभा चौथाले, विदया बोबाटे, प्रशांत लाडवे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, नायब तहसिलदार पवार, संवर्ग विकास अधिकारी, उपजिल्‍हा रूग्‍णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. इंदुरकर, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. खोब्रागडे, नगरपरिषदचे तुषार शिंदे, पोलीस निरीक्षक राजपुत यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

 

यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी टेस्‍टींगचे रिपोर्ट २४ तासाच्‍या आत मिळावे यावर भर दिला. लसीकरण केंद्रांची संख्‍या वाढविण्‍याबाबत त्‍यांनी निर्देश दिले. कोरोना केअर सेंटर मधील सुविधा उत्‍तम असाव्‍या, विशेषत: भोजन व्‍यवस्‍था उत्‍तम असावी याकडे विशेष लक्ष देण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. उपजिल्‍हा रूग्‍णालय व प्राथमिक आरोग्‍य केंद्रामधील रिक्‍त पदांची भरती लवकर व्‍हावी यासंदर्भात आपण शासनाशी पाठपुरावा करीत आहोतच, स्‍थानिक प्रशासनाने देखील याबाबत पाठपुरावा करण्‍याचे त्‍यांनी सुचित केले. ग्रामीण भागातुन नागरिक चाचण्‍यांसाठी साधनांअभावी येवू शकत नाही, त्‍यांच्‍यासाठी विशेष वाहन व्‍यवस्‍था करण्‍याबाबतही त्‍यांनी सांगीतले. गृह विलगीकरणात घरी एकच शौचालय व मोजक्‍या खोल्‍या असल्‍यामुळे ते योग्‍य पध्‍दतीने होवू शकत नाही, असे रूग्‍ण आयडेन्‍टीफाय करून त्‍यांना कोरोना केअर सेंटर मध्‍ये दाखल करावे असेही मुनगंटीवार यांनी सांगीतले. शासकीय डॉक्‍टर तसेच डॉक्‍टरांनी जनजाग़तीबाबत छोटे व्हिडीओज तयार करून समाज माध्‍यमांवर प्रसारीत करावे असेही त्‍यांनी सुचित केले.


Tags: corona centersudhir mungantiwarसुधीर मुनगंटीवार
Previous Post

“मुंबईत कोरोना मृत्यूसंख्या दडवण्याचा प्रयत्न केला जातोय”; फडणवीसांचा गंभीर आरोप

Next Post

मुंबईत युवावर्गाचे लसीकरण फक्त खासगी रुग्णालयांमध्येच! मनपा, सरकारी केंद्रांवर ४५ वर्षांवरील लसीकरण!!

Next Post
iqbal singh chahal

मुंबईत युवावर्गाचे लसीकरण फक्त खासगी रुग्णालयांमध्येच! मनपा, सरकारी केंद्रांवर ४५ वर्षांवरील लसीकरण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!