Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत युवावर्गाचे लसीकरण फक्त खासगी रुग्णालयांमध्येच! मनपा, सरकारी केंद्रांवर ४५ वर्षांवरील लसीकरण!!

मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जाहीर केले लसीकरणाचे नियोजन

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
iqbal singh chahal

मुक्तपीठ टीम

मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका मिळून कार्यरत असलेल्या ६३ लसीकरण केंद्रांवर ४५ वर्ष वयावरील व्यक्तींचेच लसीकरण करण्यात येणार आहे. १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नोंदणीकृत युवावर्गातील नागरिकांना फक्त खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवरच लस मिळणार आहे.  दिनांक १ मे २०२१ पासून सुरु होणाऱ्या १८ वर्ष वयावरील नोंदणीकृत नागरिकांच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हे निर्देश दिले आहेत. लस साठ्याचा ओघ वाढताच दररोज १ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्टही त्यांनी जाहीर केले आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस यांनी आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांसमवेत ‘टायअप’ करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

 

युवा मुंबईकरांसाठी फक्त खासगी रुग्णालयांमध्येच लसीकरण

देशातील १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्याची मोहीम शनिवार, दिनांक १ मे, २०२१ पासून सुरु होणार आहे. मुंबईत कार्यान्वित असलेल्या महानगरपालिकेच्या आणि शासकीय अशा एकूण ६३ केंद्रांवर सद्यस्थितीप्रमाणे ४५ वर्ष वयावरील नागरिकांचेच लसीकरण करण्यात येईल. नोंदणीकृत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच नोंदणीकृत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केला आहे.

 

आयुक्तांच्या बैठकीत निर्णय

दिनांक १ मे, २०२१ पासून सुरु होणाऱया १८ वर्ष वयावरील नोंदणीकृत नागरिकांच्या कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी संदर्भात आयुक्त श्री. चहल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंगळवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्र्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, संबंधीत सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच आरोग्य विभागातील सर्व संबंधीत अधिकारी सहभागी झाले होते.

 

गर्दीच्या भीतीने घेतला निर्णय

यावेळी महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल म्हणाले की, मुंबईत १८ ते ४५ या वयोगटात अंदाजे ९० लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी २ डोस याप्रमाणे सुमारे १ कोटी ८० लाख डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या मोहिमेची व्यापकता पाहता, लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे हे सर्व कळीचे मुद्दे आहेत. त्या संदर्भात महानगरपालिकेकडून सरकारकडे आणि लस उत्पादक कंपन्यांकडे देखील सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत लसीकरण मोहिमेसंदर्भातील निर्णय झाल्यानंतर त्या अनुषंगाने महानगरपालिका पुढील कार्यवाही निश्चित करेल. असे असले तरी लसीकरणाची वाढती व्याप्ती पाहता नागरिकांची गर्दी होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये आणि संपूर्ण लसीकरण मोहिमेचे व्यवस्थापन योग्यरित्या व्हावे, म्हणून निर्णय घेण्यात आले आहेत, असे श्री. चहल यांनी नमूद केले.

 

मनपाची लसीकरण मोहीम नियोजन

१. मुंबईत सध्या १३६ लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. त्यात शासन आणि महानगरपालिकेचे मिळून ६३ केंद्र आहेत, उर्वरित ७३ खासगी रुग्णालयातील केंद्र आहेत. आणखी २६ खासगी रुग्णालयांकडून मान्यतेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील केंद्रांची संख्या आता ९९ इतकी होणार आहे.

२. दिनांक १ मे पासून सुरु होणाऱया १८ वर्ष वयावरील नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण लक्षात घेता मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रांवर १८ ते ४५ या वयोगटातील नोंदणीकृत नागरिकांना लस दिली जाईल.

३. मुंबईतील शासकीय ६३ लसीकरण केंद्रांवर ४५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनाच लस देण्यात येईल. १८ ते ४५ या वयोगटातील नोंदणी केलेल्या नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. लसीकरण केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यारितीने विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

४. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अंधेरीमध्ये देखील प्रादेशिक लस भांडार सुरु करण्यात येत आहे. हे लस साठवण केंद्र सुरु झाल्यावर सध्याच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस भांडारातून पूर्व उपनगरांसाठी तर अंधेरीतील केंद्रातून पश्चिम उपनगरांसाठी लस वितरण करण्यात येईल.

५. मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण २२७ लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी सर्व संबंधित विभागीय सहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही सुरु करावी. विभागातील आरोग्य केंद्र (हेल्थपोस्ट) हे प्रमाण मानून संबंधित परिसरातील नागरिकांसाठी असे लसीकरण केंद्र सुरु करावेत. पुरेशी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी असे लसीकरण केंद्र सुरु करावेत. महानगरपालिकेच्या दवाखान्यांसह नजीकच्या खासगी रुग्णालयांना देखील त्या लसीकरण केंद्रांशी संलग्न करावे. जेणेकरुन, लसीकरणाचा प्रतिकूल परिणाम जाणवल्यास उपचार करणे सोईचे होईल.

६. मुंबईतील गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस, विविध कंपन्या यांनी खासगी रुग्णालयांसमवेत ‘टायअप’ करुन आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यानंतर पात्र सदस्यांचे प्रत्यक्ष लसीकरण करुन घ्यावे, असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

७. राज्य सरकारसह बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील लस उत्पादक कंपन्यांशी संपर्कात असून मुंबईला प्राधान्याने लससाठा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. लससाठ्याचा ओघ तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यानंतर मुंबईत दररोज किमान १ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, असे आयुक्त श्री. चहल यांनी अखेरीस नमूद केले.


Tags: coronavaccinationyouth vaccination'कोरोनातरुणांचे लसीकरणयुवा लसीकरणलसीकरण
Previous Post

“१०० बेड्सचे कोरोना सेंटर तयार करा, ५० ऑक्‍सिजन बेड्सना त्‍वरित मंजुरी द्या”- सुधीर मुनगंटीवार

Next Post

नागपूरला प्राणवायू पुरवणारे प्राणदूत प्यारेखान!

Next Post
payre khan

नागपूरला प्राणवायू पुरवणारे प्राणदूत प्यारेखान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!