Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या व्हर्टिकल लॉंच क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
vertical launch missiles

मुक्तपीठ टीम

ओडिशाच्या किनाऱ्याजवळ जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कमी पल्ल्याच्या व्हर्टिकल लॉंच क्षेपणास्त्राची (व्हीएल -एसआरएसएएम) घेतलेली चाचणी यशस्वी झाली. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून (आयटीआर ) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ ) आणि भारतीय नौदलाने भारतीय नौदलाच्या जहाजातून ही चाचणी घेतली.

व्हीएल-एसआरएसएएम, हे क्षेपणास्त्र जहाजातून चालवली जाणारी एक शस्त्र प्रणाली आहे ,जवळच्या पल्ल्यातील सागरी धोक्यासह विविध हवाई धोक्यांना नष्ट करण्याची क्षमता या प्रणालीत आहे.रडारवर दिसू नये अशी यंत्रणा असलेल्या हवाई धोक्यांचाही यात समावेश आहे.

या क्षेपणास्त्र प्रणालीच्या प्रक्षेपणादरम्यान ,हवाई धोका म्हणून सोडण्यात आलेल्या एका अतिजलद विमान प्रतिकृतीचा या क्षेपणास्त्र प्रणालीने यशस्वरीत्या वेध घेतला.

चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्राद्वारे तैनात केलेल्या अनेक मार्ग निरीक्षण साधनांचा वापर करून निकोप स्थिती मापदंडांसह प्रक्षेपकाच्या उड्डाण मार्गाचे परीक्षण करण्यात आले. डीआरडीओ आणि भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चाचणी प्रक्षेपणाचे निरीक्षण करण्यात आले.

या यशस्वी प्रक्षेपण चाचणीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ , भारतीय नौदल आणि उद्योगांचे अभिनंदन केले आहे. या प्रणालीने एक कवच प्रदान केले असून ते हवाई धोक्यांपासून भारतीय नौदलाच्या जहाजांची संरक्षण क्षमता आणखी वाढवेल, असे ते म्हणाले.

नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी ,व्हीएल-एसआरएसएएमच्या यशस्वी प्रक्षेपण चाचणीबद्दल भारतीय नौदल आणि डीआरडीओची प्रशंसा केली आहे आणि ही स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केल्यामुळे भारतीय नौदलाची संरक्षणात्मक क्षमता आणखी बळकट होईल, असे त्यांनी सांगितले.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी यशस्वी प्रक्षेपण चाचणीत सहभागी चमूची प्रशंसा केली. या चाचणीने भारतीय नौदलाच्या जहाजांवर स्वदेशी शस्त्र प्रणालीचे एकीकरण सिद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले. हे भारतीय नौदलाचे बळ अधिकाधिक वाढवणारे ठरेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड ठरेल, असे ते म्हणाले.


Tags: Defense Research and Development Organizationgood newsmuktpeethOdishavertical launch missilesVL-SRSAMओडिशाघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठव्हर्टिकल लॉंच क्षेपणास्त्रव्हीएल-एसआरएसएएमसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था
Previous Post

ई-वाहनांना आग लागण्याच्या वाढत्या घटना रोखणार, बॅटरीसाठी आवश्यक ISI मानकं जारी!

Next Post

बजाज ऑटोने नवीन Bajaj Pulsar N160 केली लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स…

Next Post
Bajaj Pulsar N160

बजाज ऑटोने नवीन Bajaj Pulsar N160 केली लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!