मुक्तपीठ टीम
भारताने जमीनीवरून हवेत लक्ष्यवेध करणाऱ्या व्हीएल-एसआरएसएएम या स्वदेशी मिसाईलची नुकतीच यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या म्हणजेच डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी चांदीपूर येथे अंतरिम चाचणी रेंजच्या एलसी -३ ने पहिल्यांदा ही चाचणी केली. स्वदेशी वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सर्फेस टू एअर मिसाईलची चाचणी यशस्वी झाली.
अवघ्या तीन तासानंतर एलसी-३ ची सायंकाळी दुसरी चाचणी घेण्यात आली. ती चाचणीही यशस्वी ठरली. या स्वदेशी मिसाईलच्या यशस्वी चाचणीने भारताची हवाई संरक्षण यंत्रणा बळकट केली आहे. हे मिसाईल नौदल आणि हवाई दलाला ताकद देण्याच्या हेतूने विकसित केले आहे. आता ते भारतीय संरक्षण यंत्रणेचा त्याचा मजबूत भाग होणार आहे.
यशस्वी चाचणीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले.
व्हीएल-एसआरएसएएम मिसाइलबद्दल सर्व काही!
• हे जमिनीवरून हवेत झेपावणारे मिसाईल आहे.
• याची लक्ष्यवेधी क्षमता ४० किमी पर्यंत आहे.
• चारही दिशानिर्देशांमधून ३६० अंशात लक्ष्य असलेल्या कोणत्याही दिशेने येणारे ड्रोन, क्षेपणास्त्र किंवा लढाऊ विमान भेदण्यास ते सक्षम आहे.
• कोणत्याही लहान जागेला (पॉइंट डिफेन्स सिस्टम) शंभर टक्के सुरक्षा देण्यात सक्षम असणार.
या चाचणीच्या वेळी संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि वैज्ञानिकांचे एक पथक उपस्थित होते. डीआरडीओ मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी ज्ञानाच्या कौशल्यासह नवीन मिसाईलची निर्मिती आणि चाचणी करीत आहे. यापुढे मिसाईल तंत्रज्ञानासाठी भारताला कोणत्याही देशावर अवलंबून राहावे लागणार नाही.
पाहा व्हिडीओ: