Friday, May 16, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

मालेगाव एमआयडीसीमध्ये उद्योग प्रकल्प जलदगतीने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – सुभाष देसाई

January 11, 2022
in घडलं-बिघडलं
0
Subhash Desai instruction on industrial projects in Malegaon

मुक्तपीठ टीम

मालेगाव येथील एमआयडीसी जलदगतीने उभारण्यात आलेली विशेष एमआयडीसी असून, याअंतर्गत असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. येथील उद्योग प्रकल्प तातडीने सुरू करण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. उद्योग नियमावलीप्रमाणे वस्त्रोद्योग पार्क व अजंग प्रकल्पांसाठी भूखंड वाटपाच्या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले.

            

मंत्रालयात नाशिक, मालेगाव येथील अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक ३ येथील प्रलंबित कामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पी. अन्बलगन, सहसचिव संजय देगांवकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर,  अवर सचिव किरण जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

            

एमआयडीसीअंतर्गत असलेल्या समस्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी मांडल्या. त्यांनी मालेगाव येथील उद्योजकांसाठी केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

           

उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, मालेगाव एमआयडीसी अंतर्गत अजंग गाव ते औद्योगिक वसाहत पोहोच रस्त्यांच्या कामासंदर्भातील कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी. तसेच अभिन्यांसातील अंतर्गत रस्ते तयार करण्यात यावेत. वस्त्रोद्योग पार्क व अजंग टप्पा क्रमांक ३ भुखंड वाटपाच्या रू ६०० प्रति चौमी या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. यानंतर ७९० प्रमाणे दर करण्यात यावेत. जे प्रकल्प काम सुरू करत आहेत त्यांना तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणीपुरवठा योजना क्रमांक दोनसाठी तांत्रिक मंजुरी तसेच निविदा प्रक्रियेची प्रक्रिया करण्यात यावी. वीजेसंदर्भातही सध्या तात्पुरत्या स्वरूपात वीज व्यवस्था करून ऊर्जा विभागासोबत पाठपुरावा करून वीजेसाठी सबस्टेशन कार्यान्वीत करावेत. प्लास्टिक, वस्त्रोद्योग, फुड व इतर उद्योगांसाठी सुधारित अभिन्यास मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश उद्योग मंत्री देसाई यांनी दिले.


Tags: Dadaji BhuseMalegaonMIDCsubhash desaiएमआयडीसीदादाजी भुसेमालेगावसुभाष देसाई
Previous Post

अष्टविनायक तीर्थक्षेत्रस्थळी पायाभूत विकासाची कामे वेळेत पूर्ण करावीत

Next Post

मेघोली प्रकल्प फुटीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई संदर्भात लवकरच निर्णय

Next Post
Vijay Wadettiwar information on compensation of Megholi project eruption

मेघोली प्रकल्प फुटीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई संदर्भात लवकरच निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!