Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अष्टविनायक तीर्थक्षेत्रस्थळी पायाभूत विकासाची कामे वेळेत पूर्ण करावीत

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना

January 11, 2022
in घडलं-बिघडलं
0
Dr Neelam gorhe instruction on Asthavinayak mandir infrastructure development

मुक्तपीठ टीम

अष्टविनायक तीर्थक्षेत्र स्थळांच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्याची अंमलबजावणी कालमर्यादेत, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत. भाविकांना वेळेत योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध होतील अशा प्रकारे ही कामे करण्यात यावीत, तसेच जी कामे सुरू आहेत.त्याबाबतचा अहवाल पंधरा दिवसात सादर करावा अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

 

अष्टविनायक तीर्थक्षेत्र स्थळांच्या सर्वांगीण विकासाच्या आराखडाच्या अंमलबजावणीविषयी दूरदृश्य प्रणाली व्दारे आयोजित बैठकीत उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे बोलत होत्या. या बैठकीस अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील. अष्टविनायक गावांचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

 

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, देवस्थानच्या ठिकाणी अपुरी कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. छोटी- छोटी कामे करण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करून कामे करावी. देवस्थान स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व मंदिर परिसरात पेस्ट कंट्रोल करण्यात यावे. उपलब्ध निधी खर्च करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे. निर्माल्यासाठी व्यवस्थित नियोजन करण्यात यावे. स्वच्छता, लाईट, पाणी यादी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात यावे. भाविक कोणत्या जिल्ह्यातून, राज्यातून येतात याची माहिती जमा करावी जेणेकरून निवासस्थानासह सोई -सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

            

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी  ११ ते १३  डिसेंबर २०२१ या कालावधीत अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा दौरा केला. अष्टविनायक तीर्थक्षेत्रांकडे जाणारे काही रस्ते दुरुस्ती करणे आवश्यक आहेत, लांबच्या रस्त्यावर दोन तासाच्या प्रवासादरम्यानच्या अंतरावर सार्वजनिक शौचालय असणे गरजेचे आहे, ज्या देवस्थानच्या जवळ तलाव आहेत, तो परिसर सुशोभित करावा. रस्त्यावर विविध सुविधा उपलब्ध असणारे दिशादर्शक बोर्ड लावणे, सर्व ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायतींने दक्ष असावे, शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी पाणी पुरवठा विभागांने लक्ष द्यावे, अन्नछत्र, प्रसाद या विषयी मंदिर समितीने नियमित प्रमाण ठरवावे, मंदिरात ठराविक वेळेत दर्शन बंद करून दर्शन ठिकाणी आणि मंदिर परिसरात निर्जंतुकीकरण करावे, अशा विविध सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

 

यावेळी मोरगाव, थेऊर, सिध्दटेक, महड, पाली, ओझर, लेण्याद्री व रांजणगाव या अष्टविनायक देवस्थान पदाधिकारी यांनी विविध समस्या व अधिकच्या सुविधा विकसित करण्याविषयी माहिती दिली. सबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सुरू असलेल्या विकासकामासंबधी माहिती दिली.


Tags: ASthavinayakDr.Neelam Gorhepuneअष्टविनायकडॉ.नीलम गोऱ्हे
Previous Post

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी मांडलं सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीचं जिल्हा विकासाचं विझन

Next Post

मालेगाव एमआयडीसीमध्ये उद्योग प्रकल्प जलदगतीने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – सुभाष देसाई

Next Post
Subhash Desai instruction on industrial projects in Malegaon

मालेगाव एमआयडीसीमध्ये उद्योग प्रकल्प जलदगतीने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य - सुभाष देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!