Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मेघोली प्रकल्प फुटीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई संदर्भात लवकरच निर्णय

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती

January 11, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Vijay Wadettiwar information on compensation of Megholi project eruption

मुक्तपीठ टीम

कोल्हापूर जिल्ह्यातील मेघोली लघु पाटबंधारे  प्रकल्प क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात पाणी गळतीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासंदर्भात शासनस्तरावर नुकसान ग्रस्तांना लवकरच भरपाई देणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

             

मंत्रालयातील  दालनात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प अचानक फुटल्याने झालेल्या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसानभरपाई मिळण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. या बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.    

           

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेने लघु पाटबंधारे प्रकल्प भरलेले होते. तसेच मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पात १ सप्टेंबर २०२१ रोजी गळती सुरू झाली या पाणीगळतीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतीत सर्व वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्राप्त असून प्राप्त पंचनामे तसेच माहितीनुसार आपद्ग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

               

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, जुलैमध्ये  झालेल्या अतिवृष्टीमुळे मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला होता. १ सप्टेंबर २०२१ रोजी या धरणाला गळती सुरू झाली. या धरणफुटीमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पाणी विसर्गामुळे या पंचक्रोशीमधील शेकडो एकर जमीन खरबडून गेली. पाण्याच्या गाळामुळे विहिरी, मोटारपंप, पाईपलाईन, विजेचे खांब, ट्रान्सफार्मर यांचे मोठे नुकसान झाले आहे. या कालावधीत २० ते २५ खेड्यांचे दळणवळण पुर्णपणे ठप्प होते. यामध्ये एक महिला मृत्यूमुखी पडली दुधाळ जनावरेही मृत पावली आहे. आपद्ग्रस्तांना तातडीने नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली.  

तुळशी प्रकल्पबाधीत जवाहर भोसले यांच्या मागणीबाबतीत सकारात्मक निर्णय

तुळशी प्रकल्पासाठी जवाहर भोसले यांची सहा हेक्टर ४७ आर जमिन संपादित करण्यात आली होती.हे संपादन चुकीच्या पद्धतीने झाल्याचे जवाहर भोसले यांचे म्हणणे आहे. त्याबदल्यात त्यांनी मंजूर झालेली सहा हेक्टर ४७ आर जमिन मिळण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत सर्व संबधितांच्याकडून माहिती घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बैठकीत सांगितले.


Tags: Kolhapurmegholivijay wadettiwarकोल्हापूरविजय वडेट्टीवार
Previous Post

मालेगाव एमआयडीसीमध्ये उद्योग प्रकल्प जलदगतीने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – सुभाष देसाई

Next Post

भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईकांवरील ‘कर्मयोद्धा- राम नाईक’ पुस्तकाचे प्रकाशन

Next Post
Publication of the book 'Karmayoddha- Ram Naik' By governer

भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईकांवरील 'कर्मयोद्धा- राम नाईक' पुस्तकाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!