Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईंचे आवाहन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यनिमित्ताने राज्यभर विविध उपक्रम आयोजित केले आहेत. यात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. मंत्रालयात मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयाद्वारे आयोजित युवा कवींच्या संमेलनाचे श्री.देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलींद गवादे, भाषा संचालक श्रीमती विजया डोणीकर उपस्थित होते. नवोदित कवी संमेलनात सहभागी युवा कवींनी आपल्या कविता यावेळी सादर केल्या.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

नव्या जाणीवांच्या कविता सादर करणारे हे कवी राज्यातील विविध भागातून निमंत्रीत केले गेले होते. यात प्रशांत केंदळे, पवन नालट, वृषाली विनायक, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, कमलेश महाले, प्रदीप कोकरे, अक्षय शिंपी आदिंनी आपल्या कविता सादर केल्या. या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान युवा कवी महेश दत्तात्रय लोंढे यांनी भूषविले.

 

निसर्गाशी नातं सांगणाऱ्या कविता, कोरोनाच्या परिस्थितीतील कविता, मातृत्व आणि नात्याच्या कविता अशा विविध विषयावरील कवितांनी रसिकांची मने जिंकून घेतली. मराठी भाषेला नवे शब्द देऊन त्यास समृद्ध करण्याची जबाबदारी युवा साहित्यिकांवर असल्याचे कवी संमेलनाचे अध्यक्ष श्री. लोंढे यांनी सांगितले. 

 

झब्बा आणि कुर्ता ही कवींची प्रतिमा आता बदलत असून जीन्स आणि टी-शर्ट या आधुनिक पेहरावातील कवी मराठी भाषेच्या संवर्धनात मोलाचा वाटा उचलत आहेत. युवा साहित्यिकांच्या रुपाने एक आशादायी चित्र या संमेलनातून दिसले आहे,  अशा शब्दात भाषा संचालक श्रीमती डोणीकर यांनी उपस्थित कवींचे आभार मानत त्यांना प्रोत्साहित केले.


Tags: Joint Secretary Milind GawadeLanguage Director Smt. Vijaya DonikarMarathi language conservation pandharvada activitiesMarathi Language Department Principal Secretary Bhushan GagraniMarathi Language Minister Subhash DesaimuktpeethPoet conventionकवी संमेलनभाषा संचालक श्रीमती विजया डोणीकरमराठी भाषा मंत्री सुभाष देसाईमराठी भाषा विभाग प्रधान सचिव भूषण गगराणीमराठी भाषा संवर्धन पंधरवडासहसचिव मिलींद गवादे
Previous Post

मुंबईत कोरोनाचा विवाह नोंदणीला फटका, मनपानं बंद केली वॉर्डांमधील व्यवस्था!

Next Post

शेतकऱ्यांना जुन्या दराने खताची विक्री करावी- कृषिमंत्री दादाजी भुसे  

Next Post
dadaji bhuse

शेतकऱ्यांना जुन्या दराने खताची विक्री करावी- कृषिमंत्री दादाजी भुसे  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!