मुक्तपीठ टीम
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजेच आयसीएआयने जुन्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना आयसीएआय सीए मे २०२२ च्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. जे उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेला बसण्याची तयारी करत आहेत ते icai.org वर अधिकृत सूचना पाहू शकतात. या परीक्षेविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमधील संबंधित बातमीची लिंक क्लिक करून muktpeeth.com तपासा.
आयसीएआय सीए मे २०२२ परीक्षेच्या अधिसूचनेनुसार, आयसीएआय सीए डिसेंबर २०२१ च्या परीक्षेत बसलेल्या आणि मेच्या परीक्षेत पुन्हा बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या योजनेतून शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुधारित योजनेत रुपांतरित करावे लागेल. जी १ जुलै २०१७ पासून लागू करण्यात आली होती.
आयसीएआयने दिलेल्या माहितीनुसार मे २०२२ च्या फाउंडेशन परीक्षेत सहभागी होण्यासाठी कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (CPT) मधून फाउंडेशनमध्ये रूपांतरित करण्याची अंतिम तारीख १३ मार्च २०२२ आहे. पूर्वीच्या योजनेतून शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुधारित योजनेत बदल करण्यासाठी, जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना eservices.icai.org येथे स्वयंसेवा पोर्टलला भेट द्यावी लागेल. तसेच त्यांचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल.
आयसीएआयच्या अधिकृत अधिसूचनेत असे म्हटले आहे की, जुन्या अभ्यासक्रमातील जे विद्यार्थी मे २०२२ मध्ये इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षेत बसू इच्छितात त्यांना १ जुलै २०१७ रोजी लागू केलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुधारित योजनेसाठी १३ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करावा लागेल.